कोपरगाव तालुका
मळगंगा देवीच्या मुखवट्यासाठी 51 हजारांची देणगी.
विघ्नहर्ता प्लास्टो कंपनीचे संस्थापक काळुरामशेठ गजरे यांचा उपक्रम
निघोज -(प्रतिनिधी )-राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या चांदीच्या मुखवट्यासाठी निघोज येथील विघ्नहर्ता प्लास्टो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष काळुरामशेठ गजरे यांनी 51 हजार रुपयांची देणगी दिली आहे. याबद्दल त्यांचा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्थ शिवाजीराव वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, सहसचिव रामदास वरखडे, व्यवस्थापक महेश ढवळे, बाळासाहेब साळवे, राजू वराळ आदी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गजरे यांचा निघोज परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान आहे. आजपर्यंत त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्यासाठी मोठमोठ्या देणग्या दिल्या आहेत. त्यांची मुंबई येथे सुरक्षा रक्षक कंपनी असून अनेक गरजू घटकांना त्यांनी कंपनीत नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे ते विश्वस्थ असून मळगंगा देवीच्या यात्रेत त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून मोफत सूरक्षा पुरवण्याचे काम ते करीत असतात. निघोज येथील विघ्नहर्ता प्लास्टो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष ते असून या कंपनीत त्यांनी अनेकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी यावेळी सांगितले गेली सहा महिन्यापासून मळगंगा देवीच्या चांदीचा मुखवटा तसेच गाभाऱ्यातील मखर यासाठी मोठय़ा प्रमाणात देणग्या उपलब्ध होत असून भाविकांनी सढळ हस्ते देणगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी देवीचे भावीक निघोज व मुंबईकर मंडळ, ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद ऊपकार्याध्यक्ष शांताराम मामा लंके कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके सचिव शांताराम कळसकर, सहसचिव रामदास वरखडे संघटक अॅड. बाळासाहेब लामखडे तसेच सर्व विश्वस्त मंडळ परिश्रम घेत असून देवीचा गाभारा व मुखवटा यामुळे मंदीराची शोभा वाढणार असून भाविकांनी सढळ हाताने देणगी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.