जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..या शहरात “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता येथील भारतीय जैन संघटना,राहाता नगरपरिषद तसेच डॉ.राजेंद्र पिपाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉक्टर आपल्या दारी” मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार हा उपक्रम नुकताच सुरु करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या निमित्ताने राहाता शहरात बंदोबस्त करणारे “पोलिस कर्मचारी” यांच्याही आरोग्याची तपासणी करण्यात आली.यावेळी बोलताना वाकचौरे म्हणाले की,” कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बाहेरुन येणा-या नागरीकांची माहिती तात्काळ नगरपरिषद तसेच पोलिस प्रशासनाला द्यावी” तसेच त्यांनी भारतीय जैन संघटना तसेच राहाता नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २७५ ने वाढून ती ३७ हजार ७७६ इतकी झाली असून १२२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ११ हजार ५०६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ४८५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३ मे पर्यंत सरकारने वाढविली आहे.शेजारी कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर राहाता नगरपरिषदेने ज्या नागरिकांना टाळेबंदीमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही त्यांना आपल्या दैनंदिन उपचारासाठी हा उपक्रम सुरु केल्याने त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

या वेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा,आरोग्य अधिकारी डॉ.गोकुळ घोगरे,डॉ.राजेंद्र पिपाडा,उपविभागिय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे व पो.नि.श्री.भोये,भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव मुनावत,नगरसेवक भिमराज निकाळे,गणेश निकाळे,भाऊसाहेब आरणे,राहाता नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक नवनाथ जगताप, डॉ.भिंगारदिवे,डॉ.अशोक लोढा,डॉ.सौरभ लोढा,डॉ.जांगडा,देवेंद्र मुनावत पंकज मुथा,नेमीचंद लोढा,पारस पिपाडा,स्वप्निल लोढा,नरेंद्र पिपाडा,शितल पिपाजा तसेच भारतीय जैन संघटना व जैन युवक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थीत होते.

राहाता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर व आण्णाभाऊ साठे नगर तसेच गौतमनगर या परिसरापासुन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरक्षित अंतराची अंमलबजावणी करुन तपासणी साठी आलेल्या रुग्णांना तपासुन त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान जर कोणी संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ ग्रामिण रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

यावेळी उपविभागिय डॉ.राजेंद्र पिपाडा तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव मुनावत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.जग भरात कोरोना विषाणुचा प्रादर्भाव वाढत आहे. आपल्या देशातही काही ठिकाणी या विषाणुने रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी भारतीय जैन संघटना तसेच राहाता नगरपरिषद व डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनद्वारे, डॉक्टरांच्या टिम मार्फत रुग्णांची तपासणी करुन त्यांना त्याच ठिकाणी मोफत औषधोपचार देण्यात आले.यावेळी परिसरातील नागरीकांनी देखील सुरक्षित अंतराची अंमलबजावणी करुन या उपक्रमास सहकार्य केले.यावेळी राहाता नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी पुर्णवेळ देवुन या उपक्रमात सहभाग नोंदविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close