- निघोज प्रतिनिधी दी. 12 मार्च
निघोज व परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायी असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे विस्तारीकरणाचे काम विकासकामांना गती देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पाताई वराळ यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच पशुवैद्यकीय दवाखान्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पाताई वराळ यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अहमदनगर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मौजे निघोज ता.पारनेर येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत दुरुस्ती करण्यात आली असून पाच लाख रुपये खर्च आला आहे.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र वसमतकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन ठुबे, ग्रामपंचायतचे सदस्य दत्तात्रय गुंड,मंगेश लाळगे,भास्करराव वराळ,भीमदादा लामखडे, ग्रामपंचायत सदस्या शितलताई वराळ, सुमनताई लोहकरे, निघोज परिसर पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोषशेठ ईधाटे, निघोज सोसायटीचे माजी उपाध्यक्ष बाबाजी वाघमारे,
मळगंगा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र लाळगे,गंगादादा वरखडे,दिलीप वराळ,माऊली वरखडे,निलेश घोडे,आकाश वराळ,नितीन लामखडे,बाळू लंके,पवन लामखडे,बाळू वराळ,रमीज शेख,सागर वराळ, आनंदा वरखडे,संकेत वराळ,आकाश वरखडे,संकेत लामखडे,अक्षय वराळ आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्या वराळ यावेळी म्हणाल्या गेली दोन वर्षात निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, युवकांचे नेते डॉ सुजय विखे पाटील, सभापती राहुल झावरे यांनी सातत्याने या विकासकामांना पाठबळ दिल्याने मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. लोकनेते मा. खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नातील खेडे आदर्श करण्याचा संकल्प आम्ही करीत असून विकासकामांचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ व त्यांचे सर्व सहकारी सातत्याने करीत असल्याने विकास कामांना गती मिळाली असल्याचे वराळ यांनी यावेळी सांगितले.