धार्मिक
मुक-बधिर विद्यालयात ‘अधिक मास’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय येथे विद्यालयाचे संस्थापक दादासाहेब चौधरी व नांदुर्खी बु.चे लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी यांचे कुटुंबियांच्या वतीने नुकताच अधिकास मासाचा (धोंड्याचा) कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
अधिक महिन्याचे संदर्भ वैदिक साहित्यात आढळतात.सौर कालगणना वेदकाळात अस्तित्वात होती आणि चांद्र कालगणना ही अस्तित्वात होती. वैदिक ऋषींना हे लक्षात आले की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता.हे अंतर भरून काढण्यासाठी काही दिवस अधिक घ्यावे लागले. वैदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर ३ वर्षांनी कालगणनेमध्ये ३० दिवस अधिक घेतले गेले.हाच तो ‘अधिक मास’ होय.त्या निमित्त जावयांचा विशेष सन्मान केला जातो.सदर कार्यक्रम शिर्डी येथे मूकबधिर विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी त्यांनी आपले जावई रमेश जाधव,मच्छिंद्र वहाडणे,मयूर कातोरे,गणेश थिटे यांच्यासह मित्र परिवार आणि ग्रामस्थांना धोंड्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी जावयांचे सपत्नीक पूजन करुन त्यांना भेटवस्तु देण्यात आल्या असल्याची माहिती विद्यालय संस्थापक,नांदुर्खी बु.गावचे लोकनियुक्त सरपंच माधव चौधरी यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात पुरणपोळी सारखी पारंपारीक मेजवानी ठेवण्यात आली होती.प्रसंगी अनेक सगे सोयरे, नातेवाईक,मित्र,नांदुर्खी बु.ग्रामस्थ उपस्थित होते.यात प्रामुख्याने माजी जि.प.सदस्य दिपक रोहम,नांदुर्खी बु तंटामुक्तीचे अध्यक्ष सोन्याबापू चौधरी,माजी सरपंच राजेंद्र चौधरी,राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव चौधरी,नांदुर्खी बु. चे उपसरपंच विरेश चौधरी,पिंपळस गावचे सरपंच दत्तात्रय घोगळ,दादासाहेब चौधरी,न.पा.वाडी सह.सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय वहाडणे,आण्णासाहेब देठे,नांदुर्खी बु ग्रामपंचायत सदस्य किरण चौधरी, सचिन कोळगे,अरुण चौधरी,अलका दाभाडे,तसेच संजय वाकचौरे,रावसाहेब दाभाडे,जनार्दन चौधरी,वसंत काळे,संदिप काळे,संजय गोरक्षनाथ चौधरी,कचेश्वर चौधरी,बाबासाहेब अनर्थे,बबन चौधरी,नितीन चौधरी व शिर्डी येथील सुदाम गोंदकर,राजेंद्र गोंदकर,अशोक गोर्डे,कोल्हे पाटील,दत्तात्रय (पिंटू)कोते,गणेश कोते,राकेश कोते,विकास गोंदकर व मित्रपरिवार तसेच श्री साई अपंग विकास महिला मंडळ सर्व सदस्या आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कासार बी.आर व विद्यालय-वसतिगृह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.उपस्थित सर्वांचे चौधरी परिवार यांचे वतीने आभार मानण्यात आले आहे.