नगर जिल्हा
पोलीस सेवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश पोकळे
संपादक-नानासाहेब जवरे
लोहगाव-(प्रतिनिधी)
शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न असलेल्या पोलीस सेवा संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी राहता तालुक्यातील लोहगाव तांबे नगर येथील सतीश अण्णासाहेब पोकळे यांची निवड करण्यात आलेली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिवराज्य कामगार हक्क संघटनेची त्रेमासिक सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच मोठ्या उत्साहात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आ.डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. याप्रसंगी नगर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संघटनेचे कार्य केवळ सामाजिक व पोलिसांना सहकार्य करण्यासाठी असल्याचे यावेळी त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सतीश पोकळे यांच्या निवडीबद्दल गोविंद नलगे,दिनेश तांबे,विलास शिरसागर याच बरोबर विविध सामाजिक स्तरातून त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे.