गुन्हे विषयक
नंगी तलवार दाखवून दहशत,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर परिसरात रात्रीच्या सुमारास शहर पोलीस गस्त घालत असताना त्यांना दत्तनगर परिसरात एक तरुण नंगी तलवार घेऊन दहशत करत असल्याची खबर लागली असता त्या ठिकाणी पोलिसानी धाव घेतली असता त्या ठिकाणी आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे (वय-२५) हा आढळून आला आहे.त्यास ताब्यात घेऊन शहर पोलिसांनी त्यास जेरबंद केले असून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही संकल्पित छायाचित्रे.
कोपरगाव शहरात उडाणटप्पू पोरे दहशत करताना आढळून येत आहे.त्यातून अनेक कज्जे उभे राहत असताना दिसत आहे.दत्तनगर,धारणगाव रस्ता,गांधीनगर,सुभाषनगर,बैलबाजार रोड,येवला रस्ता परिसर आदी ठिकाणी असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर व उडानटप्पू पोरांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा टारगट तरुणांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे अशीच घटना दत्तनगर परिसरात घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही या शिवाय काही उडाणटप्पू पोरे दहशत करताना आढळून येत आहे.त्यातून अनेक कज्जे उभे राहत असताना दिसत आहे.दत्तनगर,धारणगाव रस्ता,गांधीनगर,सुभाषनगर,बैलबाजार रोड,येवला रस्ता परिसर आदी ठिकाणी असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर व उडानटप्पू पोरांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा टारगट तरुण आणि चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.अशीच घटना शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर परिसरात दि.१६ मे च्या सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास घडली असून शहर पोलिसांना नुकतीच एक खबर लागली असता त्यात दत्तनगर परिसरात एक तरुण आपल्या हातात एक नंगी तलवार घेऊन आरडाओरडा करत त्या उपनगरात दहशत करत असल्याची बातमी पोलिसांना लागली असता त्या ठिकाणी तातडीने शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते,पोलीस नाईक कोरेकर आणि संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली असता त्या बातमीत तथ्य आढळून आले होते.त्यांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने आपले वरील नाव कृष्णा शिंदे सांगितलं आहे.मात्र त्याने हे कृत्य का केले हे सांगितले नाही त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.संभाजी शिंदे यांनी गुन्हा क्रं.२३९/२०२३ शस्र अधिनियम १९५९ चे कलम २५,४ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.बाबासाहेब कोरेकर हे करीत आहेत.