शैक्षणिक
जिल्हा परिषदेचा ‘तो’ शिक्षक निलंबित,जिल्हा परिषदेचा निर्णय
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या राहाता तालुक्यातील शिर्डी येथील शाळेला अचानक भरारी पथकाने भेट दिली असता त्या ठिकाणी एका वर्गावर शिक्षक गैरहजर दिसून आले होते.त्या बाबत वरीष्ठास अहवाल सादर करण्यात आला होता.तथापि कारवाई प्रलंबित होती ती कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पूर्ण केली असून दोषी मुख्याध्यापक प्रकाश मनोहर खरे यांना निलंबन करण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान शिर्डी येथील निलंबित मुख्याध्यापक प्रकाश खरे हे शाळे व्यतिरिक्त अनेक उद्योग करत असून ते उद्योगी गृहस्थ असल्याची चर्चा राहाता,कोपरगाव तालुक्यात सुरु असून त्यांनी अनेक नसते उद्योग केले आहे.त्यामुळे अडचणीत आले असल्याची चर्चा रंगली आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नुकताच एक गुन्हा त्यांचे विरुद्ध व त्यांनी एका इसमाविरुद्ध केला होता.त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील शिर्डी येथील शाळेस श्री साईबाबा संस्थानकडून लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधण्यात आली असून शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हजारो रुपये पगार देऊन शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे परंतु शिर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक पूर्व परवानगी न घेता कधीही आपल्या मर्जीने गैरहजर राहत असल्याची माहिती वरिष्ठांना समजली होती.त्याबाबत पालकांनीं तक्रारी केल्या होत्या.शिवाय काही वेळेस रोजंदारीवर बदली शिक्षक देऊन अनेक शिक्षक दांड्या मारून गावात राजकारण करताना आढळत असल्याचे दिसत होते.त्यावरून पालकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात अचानक भेट दिली होती.व “आम्ही पालक असून तुमच्या शाळेला देणगी द्यायची आहे” अशी बतावणी केली होती.व आपल्या शाळेतील वर्गावर कोणत्या अडचणी आहेत त्या आम्हाला सांगा असा बनाव केला होता.त्यांनी त्यावेळी प्रत्येक वर्गात जाऊन पाहणी केली असता एका वर्गावर एक शिक्षक नसल्याचे त्याचे लक्षात आले होते.त्याची नोंदणी त्यांनी सदर तक्रार पुस्तकात केली होती त्यावेळी उपस्थित शिक्षकांना हे कोणी दुसरे तिसरे नसून भरारी पथक असल्याने त्यांची बोबडी वळली होती.व त्यांच्यात तारांबळ उडाली होती.त्या नंतर या मुख्याध्यापक खरे प्रकाश खरे यांची त्रेधातिरपट उडाली होती.नंतर संबधित अधिकांऱ्यानी आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवला होता.व त्यांना कारवाईची प्रतीक्षा होती.
त्यावेळी मुख्याध्यापक प्रकाश खरे हे हजर नव्हते त्या जागी त्यांनी बदली शिक्षिका (त्रयस्थ व्यक्ती ) परस्पर ठेवली असल्याची बाब त्यावेळी चर्चली गेली होती.त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चा ३ चा भंग केला असल्याचा ठपका ठेवला होता.व कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली होती.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे भाग ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांव्ये शक्तीचा वापर करून प्रकाश मनोहर खरे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा शिर्डी याना सेवेतून निलंबित केले आहे.
दरम्यान खरे यांना आगामी काळात कर्जत येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी येथील हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.व पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडण्याची परवानगी दिलेलीं नाही.त्यामुळे राहाता तालुक्यासह अ.नगर जिल्ह्यातील बेताल शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.