शैक्षणिक
उक्कडगावच्या,’भरारी करियर अकॅडमी’ची कामगिरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील,’भरारी करियर अकॅडमी’च्या स्थापनेला अजून एक वर्ष देखील पूर्ण झाले नसताना,अल्पावधीतच या ॲकडमीचे ०५ विद्यार्थी पोलिस दलात दाखल झाले असल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव लावरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान भरारी करियर अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे-गोकूळ हिरामण गिरी,रा.नागमठाण (मुंबई लोहमार्ग पोलीस),विजय रामदास रोठे,रा.डागपिपळगाव (छ.संभाजीनगर लोहमार्ग पोलीस),अमोल पारसनाथ भुजाडे रा.विरगाव,(नाशिक ग्रामीण पोलीस),महेश अण्णासाहेब चंद्रे,रा.दत्तनगर,वैजापूर (नाशिक ग्रामीण पोलीस),चैताली नवनाथ मरकड,रा.कासली,ता.कोपरगाव (नवी मुंबई पोलीस)आदींचा समावेश आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील,’भरारी करियर अकॅडमी’ची स्थापना संचालक ज्ञानदेव निकम यांनी एक वर्षांपूर्वी केली होती.त्यावेळी या संस्थेची चिंता अनेकांनी वाहिली होती.मात्र एका वर्षातच संस्थेचे लक्षवेधी कामगिरी केली आहे.त्याबाबत तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी पोलिस दलात दाखल विद्यार्थ्यांचा सत्कार शिवाजीराव लावरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांनी पोलिस दलात दाखल झाल्याबद्दल निवडीचे श्रेय भरारी करियर अकॅडमी या संस्थेचे संचालक दिनेश निकम यांना दिले आहे.
सदर कार्यक्रमासाठी उक्कडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना निकम,विकास निकम,ज्ञानदेव निकम,शत्रूघ्न कराळे, बद्रीनाथ कराळे,माजी सरपंच नवले,नवनाथ मरकड,सचिन निकम आदींसह ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी उपस्थितांचे वनिता निकम हिने आभार मानले आहे.