वन व पर्यावरण
विहिरीत पडला बिबट्या,कोपरगाव वनअधिकारी रवाना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडी येथील शेतकरी पुंजाहारी नेहे यांच्या शेतात रांजणगाव देशमुख-देर्डे कोऱ्हाळे रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरीत रात्रीच्या सुमारास बिबट्या पडला असून तो आपल्या जीवित वाचविण्याची धडपड करताना दिसत आहे.दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना या घटनेची खबर दिली असून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले आहे.
या बिबट्या प्रकरणी तेथील कार्यकर्ते बाळासाहेब दरेकर आणि नानासाहेब नेहे यांनी आमच्या प्रतिनिधीस याबाबत कळवले असता त्यांनी कोपरगाव येथील वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना कळवले आहे.त्यांनी याबाबत त्यांचे सहकारी आदींना घटनास्थळी पाठवले आहे.मात्र त्यासाठी पिंजरा उपलब्ध नसल्याने तो श्रीरामपूर येथून बोलावला आहे.तो येण्यास उशीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.मात्र तो पर्यंत त्यांनी शेतकऱ्यास सदर विहिरीत बाज सोडून त्यास जीवदान देण्यास सांगितले आहे.
बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री,पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.बिबट्या हा मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.मात्र अलीकडील काळात त्याचे खाद्य दुर्मिळ होत असल्याने तो मनुष्य वस्तीत घुसताना आढळत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके नजीक असलेल्या धोंडेवाडीत घडली आहे.तेथील पुंजाहारी नेहे वस्ती जवळ असलेल्या विहिरीत तो भक्ष्याच्या शोधात असताना पडला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
या प्रकरणी तेथील कार्यकर्ते बाळासाहेब दरेकर आणि नानासाहेब नेहे यांनी आमच्या प्रतिनिधीस याबाबत कळवले असता त्यांनी कोपरगाव येथील वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना कळवले आहे.त्यांनी याबाबत त्यांचे सहकारी आदींना घटनास्थळी पाठवले आहे.मात्र त्यासाठी पिंजरा उपलब्ध नसल्याने तो श्रीरामपूर येथून बोलावला आहे.तो येण्यास उशीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.मात्र तो पर्यंत त्यांनी शेतकऱ्यास सदर विहिरीत बाज सोडून त्यास जीवदान देण्यास सांगितले आहे.त्या प्रमाणे ग्रामस्थानीं त्या विहिरीत बाज सोडली आहे.त्यात सदर बिबट्या विराजमान झाला आहे.मात्र रात्रभर विहिरीत राहिल्याने त्याची मोठी दमछाक झालेली दिसून आली आहे.