जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

गोदावरी कालव्याचा पुन्हा एकदा बट्याबोळ,भरणे राहणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात आधीच उन्हाळी आवर्तन उशिरा दिले असताना त्यातच पहाटे चार वाजेच्या सुमारास गोदावरी डावा कालवा ब्राम्हणगाव शिवारात कि.मी.४०/८०० या दरम्यान मंडपी नाल्याजवळ फुटला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून सदर बाब तेथील चौकीदाराच्या लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे.त्यामुळे ते आज पहाटे ०५ वाजता घटनास्थळी हजर होऊन त्यांनी कालवा बंद केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र त्यामुळे आधीच उशीरा आलेले आवर्तन आणि त्यात कालवा फुटी प्रकरण घडल्याने शेतकऱ्यांसाठी…’तो दुष्काळात तेरावा महिना’ ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान रवंदे ते ब्राम्हणगाव शिवारातील कुदळे वस्ती दरम्यान हा गोदावरी डावा कालवा हा ‘भरावात’ पद्धतीचा असून त्यासाठी तत्कालीन कालखंडात दूरवरून माती आणण्यासाठी यंत्रणा नसल्याने तेथीलच सदोष माती वापरलेली आहे.परिणामी त्या ठिकाणी भरावा फुटण्याच्या घटना वारंवार होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जलसंपदाच्या नाशिक विभागाने या हंगामातील घेतलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना ०१ रब्बी व ०३ उन्हाळी आवर्तन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्राबाहेर संपन्न झाली होती.गत पंधरवाड्यात रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज होती.गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे गत फेब्रुवारी महिन्यात मध्यावर सोडणे गरजेचे होते.मात्र ते सोडण्यास जलसंपदा विभाग खरीप हंगामाप्रमाणे व आपल्या प्रचलित सवयीप्रमाणे तथा अपयशी नियोजना प्रमाणे फोल ठरला होता.

सदर कालवा फुटीमुळे नजीकच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले असून काढणीस आलेले गव्हासारखी रब्बी पिके धोक्यात आलेली आहे.

दरम्यान सदर कालवे हे ०१ मार्चं रोजी सोडले होते.आता कुठे पाणी आपल्या शेतात येणार असल्याची स्वप्ने शेतकरी रंगवत असताना त्यातच आज दि.०७ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता कालवा ब्राम्हणगाव शिवारात,’मंडपी’ नाल्यानजीक फुटला आहे.त्यामुळे हि बाब प्रथम तेथुन संजीवनी सहकारी कारखान्याच्या कामगारांच्या कर्तव्यावरून घरी जात असताना लक्षात अली होती.त्यांचे घर ओढ्याच्या कडेला वस्ती असल्याने उघड झाली होती.त्यांनी सदरची घटना चौकीदारा श्री.शिंगाडे यांच्या लक्षात आणून दिली होती.त्यांनी सदर बाब जलसंपदाच्या कोपरगाव उपविभागाचे अधिकारी सुनील काळे यांना कळवली होती.त्यानुसार अधिकारी आज पहाटे ०५ वाजता घटनास्थळी हजर झाले होते.त्यांनी तातडीने कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून वरील सर्व चाऱ्यांचे फाटके उघडून दिले आहेत.व त्यासाठी कालवा दुरुस्तीसाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे.सदर कालवा दुरुस्तीसाठी किमान चार ते पाच दिवस लागणार आहे.त्यामुळे या उन्हाळी आवर्तनाचा बट्याबोळ होणार असून तो ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरणार आहे हे उघड आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव येथील जलसंपदाचे उपअभियंता सुनील काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेस दुजोरा दिला असून,”आवर्तन आल्या पासून कोपरगाव,वैजापूर,व विविध ग्रामपंचायती यांचे पिण्याचे पाण्याचे तलाव भरून झाले होते.मात्र संजीवनी सहकारी कारखान्याचा तलाव अद्याप बाकी असताना हि घटना दुर्घटना झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.व अद्याप पढेगाव या पुंच्छ कालव्याचे भरणे सुरूच झाले नव्हते यास दुजोरा दिला आहे.व आगामी दोन दिवसात विविध यंत्रणांच्या साहाय्याने कालवा दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान रवंदे ते ब्राम्हणगाव शिवारातील कुदळे वस्ती दरम्यान हा गोदावरी डावा कालवा हा ‘भरावात’ पद्धतीचा असून त्यासाठी तत्कालीन कालखंडात दूरवरून माती आणण्यासाठी यंत्रणा नसल्याने तेथीलच सदोष माती वापरलेली आहे.परिणामी त्या ठिकाणी भरावा फुटण्याच्या घटना वारंवार होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सन-१९२०पासून डाव्या कालव्यांवरील ब्राम्हणगावात कालवा फुटीचा आजार-माजी कार्यकारी अभियंता-उत्तमराव निर्मळ

दरम्यान याबाबत माहिती देताना जलसंपदात कोपरगाव उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव असलेले व नाशिक जलसंपदा विभागाचे माजी कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मल यांनी माहिती देताना सांगितले की,”सन-१९२० साली डाव्या कालव्याचे ब्राम्हणगाव परिसरात काम पुर्ण झाले होते.या भागातील जवळपास एक ते दीड किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या भरावासाठी वापरलेली माती संमिश्र शाडु प्रकारातील आहे. सदर मातीत मुंगेर होण्याचे प्रमाण जादा आहे.तसेच काळ्या मातीसारखा चिकणाई व चिवटपणा जास्त असतो.मात्र वापर केलेल्या मातीत तो नाही.त्यामुळे मातीच्या कणांना एकमेकांना पकडुन ठेवण्याचा गुणधर्म नसल्याने या कालवा भरावात ठिसुळपणा आलेला आहे.

“सन-१९२० च्या दरम्यान हा कालवा या भागात पहिल्याच आवर्तनात फुटला होता अशी या क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती आहे.तत्कालीन उपअभियंता यांनी या दिड किलोमीटर लांबीच्या भरावातील शाडु माती पुर्णपणे काढून तो भराव बाहेरुन आणलेल्या काळी माती व मुरुमात करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारला दिला होता.परंतु तो प्रस्ताव शंभर वर्षानंतर सुध्दा आजतागायत मंजुरीच्या टप्प्यापर्यंत पोहचला नाही त्यामुळे कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने आर्थिक तरतूद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा”-तुषार विध्वंस,कार्यकर्ते,गोदावरी कालवा कृती समिती,कोपरगाव.

सन-१९२० च्या दरम्यान हा कालवा या भागात पहिल्याच आवर्तनात फुटला होता याची आठवण करून दिली आहे.तत्कालीन उपअभियंता यांनी या दिड किलोमीटर लांबीच्या भरावातील शाडु माती पुर्णपणे काढून तो भराव बाहेरुन आणलेल्या काळी माती व मुरुमात करण्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारला दिला होता.परंतु तो प्रस्ताव शंभर वर्षानंतर सुध्दा आजतागायत मंजुरीच्या टप्प्यापर्यंत पोहचला नाही.आपण कोपरगाव येथे असताना त्या प्रस्तावाचा संदर्भ देऊन नव्याने प्रस्ताव सादर केला होता.परंतु तो वरीष्ठ स्तरावर गांभीर्याने घेतला गेला नाही.त्यामुळे आजही तीच परिस्थिती आहे.आपण कोपरगावला उपअभियंता पदावर कार्यरत असताना रात्री अपरात्री फोन खणखणला तर आपण समजून जात असु की,”नक्कीच ब्राम्हणगावला कालवा फुटला असेल.कालवा पुर्ण क्षमतेने चालवला की,कालवा हमखास फुटणार याची त्यावेळी खात्री असायची.त्यामुळे पुर्वतयारी म्हणून आपण तेथे मातीच्या गोण्या आणून ठेवत असु.विशेष म्हणजे पाण्याची बारीक धार भरावातून वाहण्यास सुरवात झाल्यानंतर इतक्या कमी वेळात भराव तुटला जातो की गोण्या टाकायला सुध्दा वेळ मिळत नसतो.मग नेहमीप्रमाणे वरच्या भागातील चाऱ्या व एस्केप सोडुन देऊन कालवा बंद करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो.वारंवार कालवा फुटीमुळे पाण्याचे नुकसान होणे,पिकांना उशिरा पाणी मिळणे,आर्थिक बोजा वाढणे हे निरंतर चालू आहे.याबाबत गांभीर्याने विचार होऊन कालव्याचा सदरचा कमकुवत भराव पुर्णतः नव्याने करणे आवश्यक असल्याचे माजी कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close