जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव ग्रा.पं.निकाल घोषित,पहिल्या टप्प्यात यांचा वरचष्मा…

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली असून यात सरपंच (विजय काळे)पदासह १५ जागा पदरात पाडून विजयी सलामी दिली आहे.तर यात आ.काळे गटाला मात्र केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

   दरम्यान आता पर्यंत प्राप्त माहितीनुसार आ.आशुतोष काळे गटास १५ ग्रामपंचायती तर कोल्हे गटास ९ तर सेना व अपक्ष प्रत्येकी १ ग्रामपंचायती प्राप्त झाल्या आहेत.पहिल्यांदा सत्ताधारी काळे गटाच्या बाजूने निकाल लागला आहे.कारण विधानसभेत जो नेता नेतृत्व करतो त्याच्या विरोधात निकाल जाताना दिसत असत मात्र यावेळी आ.आशुतोष काळे अपवाद ठरले आहे हे विशेष!

दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ.काळे गटाने सलामी दिली आहे.यात कोल्हे गटाला केवळ दोन जागांवर मम् म्हणावे लागले आहे.
तर भोजडे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच (सुधाकर वादे)पदासह सर्वच्या सर्व ९ जागा काळे गटाने पटकावल्या आहेत यात कोल्हे गटाला साधा भोपळा फोडता आला नाही.
खिर्डी गणेश गत मपंचायतीत परजणे गटाचा पाडाव झाला असून ही ग्रामपंचायत सरपंच (चंद्रकांत चांदर) पदासह सात जागा कोल्हे गटाने पटकावल्या आहेत.तर सत्ताधारी परजणे गटास केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.
तर कोळपेवाडी हा पारंपरिक गड काळे गटाने सरपंच म्हणून चंद्रकला कोळपे यांचे  पदासह नऊ जागा पटकावून कायम राखला आहे तर कोल्हे गटास केवळ ४ जागांवर  धन्यता मानावी लागली आहे.


दरम्यान माहेगाव देशमुख हा आ.काळेंचे स्वतःचे गाव असताना मागील निवडणुकीत नेमके सरपंच पद गमवावे लागले होते.मात्र यावेळी ते सावध आढळले असून त्यांनी सरपंच पदासह दहा जागा आपल्या शिरपेचात खोवल्या आहे.व सरपंच पदी सुमानबाई रोकडे या विराजमान झाल्या आहेत.तर कोल्हे गटास केवळ एक जागेवर समाधान पावावे लागले आहे.

निवडून आल्यावर जल्लोष करताना विजयी गटाचे कार्यकर्ते दिसत आहे.

दरम्यान ताज्या माहितीनुसार चांदेकसारे येथे सरपंच पदासह जागा काळे गटास ११ प्राप्त झाल्या आहे.कोल्हे गटास २ जागा प्राप्त झाल्या आहेत.सरपंच पदी किरण विश्वनाथ होन हे विराजमान झाले आहेत.

वेस-सोयगाव ग्रामपंचायतीत अपक्ष दिघे गटाने दुसऱ्यांदा इतिहास रचला असून सरपंच आणि चार जागा पदरात पाडून विजयी जल्लोष केला त्याचे छायाचित्र.

तर वेस-सोयगाव ग्रामपंचायत निवडणुकित अपक्ष गटाचे माजी सरपंच माणिक दिघे यांच्या गटाच्या सरपंच (जया प्रकाश माळी)पदासह चार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.व प्रस्थापित काळे गटास तीन जागा मिळाल्या आहेत.तर -कोल्हे गटास दोन जागा सह इतर दोन जण निवडून आले आहे.यात कोल्हे गटास धोबीपछाड दिली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

बहादरपूरचे नूतन सरपंच गोपीनाथ पाराजी रहाणे.

दरम्यान बहादरपूर या कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायत आ.काळे गटासह अन्य सहकारी गटांनी सहा जागा हिसकावून घेतल्या असून सरपंच (गोपीनाथ पाराजी रहाणे ) या तुलनेनं नवख्या उमेदवाराने कोल्हे गटाचे कैलास रहाणे यांचा १३० मतांनी पाडाव केला आहे.त्यांना केवळ तीन जागांवर गोची केली आहे.

तर ताज्या माहितीनुसार डाऊच खु.ग्रामपंचायतीत सेनेच्या स्नेहा संजय गुरसळ यांनी काळे गटासह सहा जागा व  सरपंचपद राखले  आहे.व  तर परजणे एक जागा मिळाली आहे.मात्र कोल्हे गटास भोपळा फोडता आला नाही.

डाऊच बु.कोल्हे गटास सरपंच पद (दिनेश गायकवाड)व सहा जागा मिळवून बाजी मारली आहे.तर काळे गटास एक जागेवर मम म्हणावे लागले आहे.

दरम्यान वडगाव ग्रामपंचायतीत काळे गटास ६ तर कोल्हे गटास १ जागा मिळून काळे गटाचे संदीप सांगळे हे विराजमान झाले आहे.पढेगाव,शहापूर,आदी ठिकाणी सरपंच पद काळे गटाने आपल्या पदरात पाडून घेतल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान शहापूर निवडणुकीत आ.काळे गटास सरपंच(घारे योगिता). पदासह तीन जागा प्राप्त झाल्या असून चार जागा मिळून कोल्हे गटास बहुमत मिळाले असले तरी सरपंच यांचे निर्णयाक मत महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान मोर्वीस ग्रामपंचायत काळे गटाच्या सविता जनार्दन पारखे या निवडून आल्या आहेत.तर पाच जगावर कब्जा मिळवला आहे तर कोल्हे गटास केवळ दोन जागांवर शेपूट गुंडाळावे लागले आहे.

दरम्यान पढेगाव ग्रामपंचायतीत मीना शिंदे या काळे गटाकडून तीन जागांसह निवडून आल्या आहेत.कोल्हे गटास ६जागा मिळून बहुमत मिळाले आहे.या ठिकाणी कोल्हे गटास गड मिळवला पण सिंह गमवावा लागला आहे.

देर्डे कोऱ्हाळे ग्रामपंचायतीत कोल्हे गटाने सरपंच (नंदा दळवी) पदासह चार जागा घेऊन गुलाल घेतला असून सरपंचपद प्राप्त झाले आहे.त्यामुळे संजीवनीचे संचालक अरुण येवले यांची टोपी आणखी कडक झाली आहे तर काळे गटास पाच जागा मिळाल्या आहे.त्यामुळे गतिरोधक असल्याचे भान त्यांना ठेवावे लागणार आहे.

बहादराबाद ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच अश्विनी विक्रम पाचोरे.

नुकत्याच प्राप्त माहितीनुसार बहादराबाद ग्रामपंचायत कोल्हे गटाने राखली असून त्यावर अश्विनी विक्रम पाचोरे यांनी सरपंच पदावर आपले नाव कोरले असून सहा जागा राखल्या आहे.तर काळे गटास केवळ एक जागेवर आत्मलुब्ध व्हावे लागले आहे.

दरम्यान सोनेवाडी ग्रामपंचायत निवडणूक निकाल नुकताच हाती आला असून कोल्हे-परजने गटास नऊ तर काळे गटास चार जागा मिळाल्या आहेत.सरपंचपद कोल्हे-परजणे गट शकुंतला गुडघे यांना मिळालेले आहे.त्या कोल्हे गटाच्या मानल्या जातात.

दरम्यान चासनळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आ.काळे गटाच्या सुनीता बनसोडे या निवडून आल्या आहेत.यात कोल्हे गटास सहा तर काळे गटास चार तर अपक्ष एक जागा प्राप्त झाल्या आहेत.

दरम्यान तळेगाव मळे ग्रामपंचायतीचा निकाल नुकताच हाती आला असून यात कोल्हे परजणे युतीस सरपंच पदासह सहा जागा प्राप्त झाल्या आहेत तर काळे गटास तीन जागा काळे गटास प्राप्त झाल्या आहेत.सरपंच पदी युतीच्या टूपके आरती दत्तात्रय या निवडून आल्या आहेत.

तर राजकिय निरीक्षकांचे लक्ष लागून असलेल्या करंजी ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाचे सरपंच रवींद्र आगवन यांचेसह पाच जागा निवडून आल्या आहेत.तर आ.काळे गटास केवळ केवळ चार जागा मिळाल्या आहेत.तर एक जागा अपक्षास मिळाली आहे.या आधी एक जागा बिनविरोध निवडून आलेली आहे.

नुकत्याच आलेल्या निकालानुसार खोपडी ग्रामपंचायत निकाल हाती आला असून यात कोल्हे गटाचे सरपंच म्हणून विठाबाई वारकर या ३ जागांसह विराजमान झाल्या आहेत तर काळे गटास चार जागा मिळाल्या आहेत.

हंडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून सरपंच पदी काळे गटाचे निवृत्ती घुमरे हे सात पैकी १ जागा घेऊन निवडून आले आहे तर या ठिकाणी कोल्हे गटास ६ जागा मिळून बहुमत प्राप्त झाले आहे.

बक्तरपूर निकाल नव्याने हाती आला असून या ठिकाणी सरपंचपदी काळे गटाचे मुक्ताबाई नागरे या ५ जागा घेऊन विराजमान झाल्या आहेत.कोल्हे गटास काळे गटाने केवळ दोन जागांवर अस्मान दाखवले आहे.

दरम्यान धारणगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती आला असून या ठिकाणी सरपंचपदी वरूणा दीपक चौधरी या ९ जागा घेऊन विराजमान झाले आहे. तर काळे गटास दोन जागा मिळाल्या आहेत.यात दोन उमेदवारांना समान मते पडली होती त्यांची निवड चिट्ठी पद्धतीने केली असून यात अण्णासाहेब रणशूर यांचे नशीब फळास आले आहे.

रांजणगाव देशमुख येथील विजयी महिला सरपंच जिजाबाई गजानन मते या दिसत आहे.

रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत काळे-कोल्हे युतीच्या सरपंच जिजाबाई गजानन मते यांनी दहा जागा घेऊन विजयी सलामी दिली आहे.तर बंडखोर गोर्डे गटास एक जागा मिळाली आहे.

दरम्यान या निवडणुक मतमोजणीस तहसीलदार विजय बोरुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख व्यवस्था ठेवली होती मात्र पत्रकारांना प्रारंभी प्रवेश नाकारला होता त्यामुळे त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या मतमोजणीस कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कुठलाही अनुचित प्रकार मतमोजणीच्या वेळी घडला नाही.त्यामुळे निवडणूक व पोलीस प्रशासनाचे मतदार आणि कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close