जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव तहसील समोरील…ते आंदोलन अखेर स्थगित !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मौजे जवळके हद्दीत रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये रस्ता भूसंपांदनाच्या कार्यवाहीचे आदेश काढल्याचे निषेधार्थ कोपरगाव तहसील कार्यालयासमोर महिलांसह शेतकऱ्यांनी सुरु केलेले “ठिय्या आंदोलन” आज महसूल विभागाने सदर नोटीस मागे घेतल्याने संपुष्टात आले आहे.त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आज तहसीलदार विजय बोरुडे यांनी आज संबंधित मंडलाधिकारी कळसे यांना योग्य समज देऊन सदर नोटीस रद्द करण्यास सांगितले होते.त्यानुसार आज दुपारी ०४ वाजेच्या सुमारास संबंधित मंडलाधिकारी प्रताप कळसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटून,”सदर नोटीस नजरचुकीने दिली गेल्याचे व ती आपण रद्द करत असल्याचे लेखी दिले आहे.त्याबाबद शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो.हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे,त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते.तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय,याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते.ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात.मात्र जवळके येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने केलेल्या अर्जात शेतकऱ्यांना नैसर्गिक हक्क डावलून थेट रस्ता संपादित करण्याच्या नोटिसा महसुलचे पोहेगाव येथील मंडलाधिकारी प्रताप कळसे यांनी काढल्या होत्या.
त्यानुसार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजर रहाण्यास बजावले होते.विशेष म्हणजे वादीने सदर रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त,मोजणी कार्यालयाचे प्रतिनिधी व योग्य ती साधन सामग्री करून उपस्थित रहाण्यास बजावले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली होती.त्या मुळे शेतकरी संतप्त होऊन त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर काल सकाळी बेमुदत,”ठिय्या आंदोलन” सुरु केले होते.

दरम्यान आज तहसीलदार विजय बोरुडे यांनी आज संबंधित मंडलाधिकारी कळसे यांना योग्य समज देऊन सदर नोटीस रद्द करण्यास सांगितले होते.त्यानुसार आज दुपारी ०४ वाजेच्या सुमारास संबंधित मंडलाधिकारी प्रताप कळसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटून,”सदर नोटीस नजरचुकीने दिली गेल्याचे व ती आपण रद्द करत असल्याचे सांगून स्थळ निरीक्षण करण्याची दुरुस्त नोटीस देणार असल्याचे” लेखी दिले आहे.त्यानंतर आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.

दुसऱ्या बाजूस संबंधित संस्थाचालक अशोक रोहमारे व के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी सदर आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.त्याबाबत चर्चा करुन सर्वसंमतीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.त्यावेळी संस्थाचालकांच्या संस्थेस व वर्तमान रस्त्यास उपस्थित कोणाचाही विरोध नाही हि बाब निदर्शनास आणून दिली आहे.”पूर्वीच्या वहिती रस्त्यास आमच्या जमिनी आधीच दिल्या असताना दुसऱ्यांदा तर काहींच्या तिसऱ्यांदा जमीन देण्यास” शेतकऱ्यांनी सक्त विरोध दर्शवला आहे.

दरम्यान आज दुसऱ्या बाजूस संबंधित संस्थाचालक अशोक रोहमारे व के.जे.सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी सदर आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.त्याबाबत चर्चा करुन सर्वसंमतीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.त्यावेळी संस्थाचालकांच्या संस्थेस व वर्तमान रस्त्यास उपस्थित कोणाचाही विरोध नाही हि बाब निदर्शनास आणून दिली आहे.”पूर्वीच्या वहिती रस्त्यास आमच्या जमिनी आधीच दिल्या असताना दुसऱ्यांदा तर काहींच्या तिसऱ्यांदा जमीन देण्यास” शेतकऱ्यांनी सक्त विरोध दर्शवला आहे.व जवळके येथील संस्था इमारतीस पश्चिमेस कोणीही रस्ता देणार नाही असे स्पष्ट बजावले आहे.व जवळचे कोणीतरी तुमची दिशाभूल करत असून नकाशा दाखवून तुम्ही वस्तुस्थिती समजावून घ्यावी अशी विनंती केली आहे ती रोहमारे यांनी मान्य केली आहे.

सदर प्रश्नी जवळके येथील उपसरपंच विजय साहेबराव थोरात,राजेंद्र सूर्यभान थोरात,जालिंदर शिवाजी थोरात,शांताराम चांगदेव थोरात,पुंजाबाई पोपट वाघचौरे,भाऊसाहेब वाघचौरे,शिलाबाई छबू वाघचौरे,गं.भा.इंदूबाई भागवत थोरात आदीनीं चर्चेत सहभाग नोंदवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close