निधन वार्ता
मंदाबाई रहाणे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ कार्यकर्ते दगडू रहाणे यांची पत्नी मंदाबाई दगडू रहाणे (वय-६०)यांचे काल रात्री १०.४२ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर बहादरपूर येथील स्मशानभूमीत आज सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.मंदाबाई रहाणे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या लढ्यात दगडू पाटील रहाणे आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे.त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे जेष्ठ विधिज्ञ अजित काळे,संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,सचिव कैलास गव्हाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,रंगनाथ रहाणे,नानासाहेब गाढवे,गोरक्षनाथ शिंदे,भास्कर महाराज गव्हाणे,साईनाथ महाराज रहाणे,बाबासाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ पाडेकर,भाऊसाहेब गव्हाणे,सोपान थोरात,बी.सी.रहाणे, कानिफनाथ गव्हाणे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.