निवडणूक
…या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीची निवडणूक संपन्न होत असून सदर निवडणूक संजीवनी व कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्या प्रमाणे बिनविरोध करून तालुक्याला आपल्या प्रबळ नेत्यांप्रमाणेच आदर्श निर्माण करून द्यावा असे आवाहन कोपरगाव येथील वकील संघाचे युवा सदस्य अड्.योगेश खालकर यांनी केले आहे.
“कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित काळे-कोल्हे या नेत्यांचा आदर्श घेऊन त्यांनी ज्या प्रमाणे आपल्या दोन्ही सहकारी कारखाण्याच्या निवडणुका कोणालाही न कळता बिनविरोध केल्या आहेत तोच कित्ता कार्यकर्त्यानी गिरवून आपल्या निवडणुका बिनवोरोध करून आपले व गावाचे हित जोपासावे व गावाची व आपली प्रगती साधावी”-अड्.योगेश खालकर,विधीज्ञ,कोपरगाव वकील संघ.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी नुकतीच केली आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह २६ ग्रामपंचायतीचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर हे मत व्यक्त केले आहे.
रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ११ सदस्य व १ लोकनियुक्त सरपंच असे एकूण १२ उमेदवारासाठी अनेक इच्छुक आपले भवितव्य आजमावणार आहेत.त्यामुळे हि निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलें आहे की,”गेली अनेक पिढ्यांपासून एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे राहतो त्यामध्ये कोणी जय अथवा पराजय होतो.त्यामधून कायमचे वैमनस्य निर्माण होऊन भाऊबंदकी पणाला लागते व कष्टाने कमावलेल्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो.शेवटी निवडणूक संपली की पाच वर्षात आपल्याला कोणी पराभूत केले याचा अभ्यास करावा लागतो.ज्या मतदाराने मतदान केले,”त्याने तुला मतदान केले नाही” असे भासवुन कायमस्वरूपी एकत्र येणार नाही असा चौख बंदोबस्त राजकीय कार्यकर्ते करतात असे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे वैमनस्य वाढून जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित काळे-कोल्हे या नेत्यांचा आदर्श घेऊन त्यांनी ज्या प्रमाणे सहकारी कारखाण्याच्या निवडणुका बिनविरोध केल्या आहेत तोच कित्ता कार्यकर्त्यानी गिरवून आपल्या निवडणुका बिनवोरोध करून आपले व गावाचे हित जोपासावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान या निवडणुकीत आपण व आपले कुटुंब भाग घेणार नाही त्यामुळे कोणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन करून त्यांनी पुढे म्हटले आहे की,”परिणामस्वरूप रांजणगाव देशमुख ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर आपल्या रांजणगाव देशमुखचे नाव महाराष्ट्रात होईल तसेच शासनाचा निधी मिळेल व उमेदवारांचे पैसे व वेळ खर्च होणार नाही तसेच वैमनस्य न राहता भाऊबंदकी संपुष्टात येईल व आपल्या गावाची प्रगती होईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन ॲड.योगेश खालकर यांनी शेवटी केले आहे.