जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आपल्या पाठपुराव्यामुळेच कोपरगावसाठी मदत निधी-…या आमदारांचा दावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीची मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी १ कोटी ३१ लाख मदत अनुदान प्राप्त झाले असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केला आहे.

“आपण केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून शासनाने कोपरगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एकूण १ कोटी ३१ लाख रुपये अनुदान स्वरूपातील मदत मंजूर करण्यात आली आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव मतदार संघासह राज्यातील शेतकऱ्यांना जून महिन्यात वाट पहायला लावणाऱ्या वरून राजाने जुलै महिन्यापासून हजेरी लावून आजही सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील सोयाबीन,मका,कापूस,बाजरी,चारा पिके,कांदा रोपे,फळबागा,ऊस आदी पिकांना देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. याला कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नसून मतदार संघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा पाठपुरावा आ.काळे यांनी केला होता असे म्हटले आहे.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून शासनाने कोपरगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एकूण १ कोटी ३१ लाख रुपये अनुदान स्वरूपातील मदत मंजूर करण्यात आली असून हि मदतीची रक्कम लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close