गुन्हे विषयक
चांगला सल्ला पडला महागात,आरोपीची फिर्यादीस मारहाण,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने शिर्डी-लासलगाव रस्त्यावर मढी फाटा येथे उभा असलेल्या आरोपीस,”तू,रस्त्यावर मध्यभागी उभा राहू नको,दुर्घटना होईल” असे म्हटल्याचा राग येऊन त्याने फिर्यादिस गाडीवरून ओढून खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी जाकिर शेख (पूर्ण नाव माहिती नाही)याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी अण्णासाहेब श्रीपत गवळी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपी जाकिर शेख हा रस्त्यात उभा असल्याचा जाबसाल केल्याचा व सल्ल्याचा आरोपीस इतका राग आला व त्याने फिर्यादिस गाडीवरून खाली ओढून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व शिवीगाळ करून,’तू,कोण मला सांगणारा.जास्त शहाणपण केला तर जीवे मारून टाकील” अशी थेट धमकी दिली आहे.व या प्रकरणी फिर्यादी अण्णासाहेब गवळी यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,हिंदू संस्कृती माणसाला माणसा-माणसात देव पाहायला शिकवते व त्यास देव वा ईश्वर म्हणूनच व्यवहार करायला सांगते.त्यामुळे आज ‘हिंदू संस्कृती’ जगात टिकून आहे.व तिंचा आज आदर्श मानला जातो.यात काहीच संशय नाही.मात्र वर्तमानात ‘कलियुग’ आहे आणि माणसाला चांगला सल्ला देणे किती महागात पडते याचे मासलेवाईक उदाहरण कोपरगावात तालुक्यातील मढी बु.हद्दीत पाहायला मिळाले आहे.त्यामुळे हे उदाहरण ‘वर्तमानात माणसाला चांगला सल्ला देणे’ किती महागात पडू शकते याचे उदाहरण म्हणून पाहायला काही हरकत नाही.हा ‘चांगला सल्ला’ मढी बुद्रुक येथील एका कार्यकर्त्यास चांगलाच महाग पडला आहे.व ज्याचे हित पाहिले त्या अडबंगनाथाने त्यास चांगलाच प्रसाद दिला आहे.त्यामुळे मढी आणि परिसरात व तालुक्यात हा एक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
त्याचे झाले असे की,”फिर्यादी अण्णासाहेब गवळी हे मढी बुद्रुक येथील रहिवासी आहेत.ते दि.१३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या घरी आपल्या दुचाकीवरून जात असताना शिर्डी-लासलगाव रस्त्यात मढी फाटा येथे एक इसम रस्त्याच्या मधोमध उभा होता.त्यावरून त्यांनी सदिच्छेने त्यास काही दुखापत होऊ नये या उद्देशाने त्यास छेडले होते.व त्यास म्हणाले की,”तू,रस्त्याच्या मध्यभागी का थांबला आहे ? रात्र झाली आहे काही अपघात होईल व तुला दुखापत होईल”असे म्हणून त्यास रस्त्याच्या बाजूला व्हायची विनंती केली होती.ती त्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे.
सदर आरोपी इसमास फिर्यादी गवळी यांच्या सल्ल्याचा इतका राग आला व त्याने फिर्यादिस गाडीवरून खाली ओढून त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व शिवीगाळ करून,’तू,कोण मला सांगणारा.जास्त शहाणपण केला तर जीवे मारून टाकील” अशी थेट धमकी दिली आहे.व या प्रकरणी फिर्यादी यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी जाकिर शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी अण्णासाहेब गवळी (वय-५१)रा.मढी बु. यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पोलीस नाईक आर.टी.चव्हाण यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.३६०/२०२२ भा.द.वि.कलम ३२५,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.चव्हाण केली आहे.