विशेष दिन
कोपरगावात…या विदयालयांत गुरु पौर्णिमा साजरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं गुरु-शिष्य परंपरेची महती स्पष्ट करणारी ‘गुरु पौर्णिमा’ मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे.
आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात.या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे.गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे जसे, महाभारतातल्या कथेमध्ये महान धनुर्धारी अर्जुनाचे गुरू द्रोणाचार्य होते.त्यांनी गुरूचा आदर केला ते पुढे भविष्यात महान,आदर्श व्यक्ति गणले गेले हि परंपरा भविष्यातही सुरु राहील यात शंका नाही.यादिवशी गुरूला वंदन करण्याची प्रथा आहे.कोपरगावात गोकुळचंदजी विद्यालयात पाळली आहे.
सदर प्रसंगी महर्षि व्यास यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट करतांना मुख्याध्यापक को-हाळकर यांनी भारतिय संस्कृती मध्ये गुरु-शिष्य परंपरेची थोर परंपरा असुन विदयार्थीनी त्यांची माहीती करुन घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले आहे.
प्रारंभी कु.जोया पठाण,निदा फातेमा मन्सुरी,मुब्बाशिरा मन्सुरी,गौरी राऊत,क्रांती लासनकर,मनस्वी निकुंभ,स्वरा टोरपे,वैष्णवी वाडेकर,प्रणिता अहिरे आदी प्रार्थना म्हटली.माहीन शाह हीने गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट केले.आफशा शहा हीने दिन विशेष सांगितले.गुरु पौर्णिमाची महती सांगणारे नृत्य कु.सायली घोडेराव,दिपाली आदमाने,साची मुदबखे,अन्यना मापारी,समिक्षा सुकटे,जिनत शेख यांनी सादर केले.तनुष्का सोनपसारे,अरिबा शहा हीने प्रश्नमंजुषा सादर केली.गुरु द्रोणाचार्य विषयी सुजल साबळे यांनी माहीती सांगितली.गायत्री आवारे हीने समूहगीत सादर केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायत्री चंडाले व जारा शेख हीने केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयालयांचे शिक्षक के.एस.गोसावी,वाय.के.गवळे,पी.बी.जगताप,एस.सी.बर्डे,सौ.एस.टी.डरांगे,सौ.एस.ए.अजमेरे,सौ.पी.डी.तुपसैंदर,सौ.सी.व्ही.निंबाळकर,सौ.जी.एन.जाधव,सौ.साळुंके आर.बी.,सौ.एस.आर.गंगवाल,सौ.एस,डी.जाधव,सौ.एस.आर.अजमेरे आदि शिक्षकांनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाला विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,पर्यवेक्षिका यु.एस.रायते आदि बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.