जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेच्या गळ्यातील पोत लंपास,कोपरगावात चोरट्या महिलेला पकडले

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बस स्थानकात चोरट्यांची दहशत वाढली असून येवला तालुक्यातील महालखेडा येथील महिला बस मध्ये चढताना सुमारे ४० हजार रुपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ दोन चोरट्या महिलांनी ओरबाडून घेऊन पोबारा केला होता मात्र या प्रकरणी फिर्यादी महिला कमलाबाई दत्तात्रय नागरे (वय-७६) यांनी गुन्हा दाखल केल्यावर शहर पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपी महिला सरस्वती दत्तू खंदारे हिला जरबंद केले आहे.तर दुसरी महिला कोयना तुकाराम सकट श्रीरामपूर हि फरार झाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

या गुन्ह्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,पो.कॉ.मासाळ,महिला पोलीस कर्मचारी दिवे आदींच्या सहाय्याने शोध घेतला असता वरील वर्णनाची एक महिला पोलिसांना मिळून आली होती.तिला त्यांनी ताब्यात घेतले असता तिने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता तिने गुन्हा कबूल केला आहे.तिचे नाव सरस्वती दत्तू खंदारे,रा.अशोक नगर फाटा,आटेंदार चौकी श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.तिच्या अंगझडतीत वरील ऐवज मिळून आला आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला हि महालखेडा ता.येवला येथील रहिवासी असून त्या आपल्या काही कामासाठी कोपरगाव शहरात आल्या होत्या.त्यांचे काम आटोपून त्या घरी जाण्यासाठी दि.१४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये चढत असताना त्या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांनी त्यांच्या गळ्यातील गोल मण्याची १२ ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोथ मागील बाजूने ओरबाडून पोबारा केला होंता.मात्र फिर्यादी महिलेच्या आरोपी महिला या पाहिल्या होत्या.त्यात एक उंच गोरा रंग असलेली होती.शरीराने मजबूत वय वर्ष ५०-५५ असे होते.फिर्यादी महिलेने त्या नंतर त्यांच्या सोबत असलेल्या शोभा किसन गायकवाड या माहिलेचेस सहाय्याने शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दखल केला होता.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अज्ञात दोन महिलांच्या विरुद्ध क्रं.२१६/२०२२भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली होती.

या गुन्ह्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,पो.कॉ.मासाळ,महिला पोलीस कर्मचारी दिवे आदींच्या सहाय्याने शोध घेतला असता वरील वर्णनाची एक महिला पोलिसांना मिळून आली होती.तिला त्यांनी ताब्यात घेतले असता तिने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.मात्र पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता तिने गुन्हा कबूल केला आहे.तिचे नाव सरस्वती दत्तू खंदारे,रा.अशोक नगर फाटा,आटेंदार चौकी श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.तिच्या अंगझडतीत वरील ऐवज मिळून आला आहे.तिच्याकडे चौकशी केली असता दुसरी महिला हि कोयना तुकाराम सकट असल्याचे निष्पन्न झाले आहे.मात्र ती फरार झाली आहे.पोलिसांनी या आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिला न्यायालयात हजर करून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी मागीतली आहे.कोपरगाव शहर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close