निधन वार्ता
लक्ष्मण थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व प्रगतशील शेतकरी लक्ष्मण बाबुराव थोरात (वय-५७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने शिर्डी येथे रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.
स्व.लक्ष्मण थोरात हे अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे म्हणून जवळके आणि परिसरात परीचीत होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अंत्यविधी होणार आहे.