महसूल विभाग
उत्पन्नाचे व हयातीचे दाखले सादर करण्यास ५ जूलैपर्यंत मुदतवाढ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ नियमित सुरु ठेवण्यासाठी उत्पन्नाचा व हयातीचे दाखले सादर करण्यासाठी ५ जूलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राहाता तालुक्यातील ६४३८ लाभार्थ्यांनी अद्याप दाखले सादर केले नाहीत. मुदतीत दाखले सादर करण्याचे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी १ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत दाखले सादर करणेबाबत निर्देश दिलेले होते. या मुदतीत दाखला सादर न केलेल्या लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. राहाता तालुक्यात १२६५० लाभार्थी असून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कालावधीत ६२१२ लाभार्थ्यांनी दाखले तहसील कार्यालयात सादर केले आहेत. उर्वरित ६४३८ लाभार्थांनी दाखले सादर केले नाहीत.
वाढीव मुदतीत उत्पन्न व हयातीचे दाखला सादर न केल्यास या लाभार्थाचा लाभ बंद करण्यात येईल. असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कुंदन हिरे यांनी शेवटी केले आहे.