गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात शटर लॉक तोडून मोठी चोरी,शिर्डीत गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले इलेक्टरीक दुकानदार रवींद्र रघुनाथ गुंजाळ (वय-३८) यांचे खंडोबा मंदिराच्या दक्षिणेस असलेले “ओंमकार बॅटरी व इन्व्हर्टर” नावाचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रात्री अज्ञात चोरट्यानी त्यातील विविध इलेक्टरीक वस्तुसंह ४.८३ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे पोहेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संकल्पित छायाचित्र.
फिर्यादी गुंजाळ हे आपले दैनंदिन कामे उरकून रात्री ०८ वाजेच्या सुमारास आपले दुकान दि.२९ जून रोजी बंद केले होते.व सकाळी नेहमी प्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दि.३० जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तात्यांच्या दुकानांच्या शटरचे कुलूप तोडलेले आढळून आले आहे.त्याबाबत त्यांनी त्वरित शिर्डी पोलीस ठाण्यास याची खबर दिली असून त्या ठिकाणी शिर्डी पोलिसानी आपला स्थळ पंचनामा केला असता सुमारे ४.८३ लाख रुपयांचे इलेक्टरीक सामान गायब झाले असल्याचे दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी गुंजाळ हे पोहेगाव येथील राहिवासी असून त्यांनी पोहेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या व्यापारी संकुलात आपले इलेक्टरीक सामानाचे दुकान साधारण २००७ साली चालू केले होते.सदर दुकान सुस्थितीत सुरु असताना त्यांनी आपले दैनंदिन कामे उरकून रात्री ०८ वाजेच्या सुमारास आपले दुकान दि.२९ जून रोजी बंद केले होते.व सकाळी नेहमी प्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दि.३० जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानांच्या शटरचे कुलूप तोडलेले आढळून आले आहे.त्याबाबत त्यांनी त्वरित शिर्डी पोलीस ठाण्यास याची खबर दिली आहे.
याबाबत त्यांनी शिर्डी पोलिसाकडे गुन्हा दाखल करून आपला स्थळ पंचनामा केला असता त्या ठिकाणी फिर्यादिस आपले दुकानातील ६४ हजार रुपये किमतीचे ओकाया कंपनीच्या ट्युबलर बॅटऱ्या,३१ हजार रुपयें किमतीच्या इस्टमन कंपनीच्या दोन ट्युबलर बॅटऱ्या,१९ हजार ८०० रुपये किमतीच्या अमरॉन कंपनीच्या कार व ट्रॅक्टरच्या बॅटरीचे चार नग,०१ लाख ५० हजार किमतीच्या जुन्या किमती बॅटरी,५० हजार किमतीच्या एक्साईट कंपनीच्या गिऱ्हाईकाच्या परत देण्यासाठी आलेल्या बॅटरी,०७ हजार ८०० रुपये किमतीच्या पॅनोसॉनिक कंपनीचा एक नवीन होम थिएटर,२२ हजार ५०० रुपये किमतीचे ४३ इंची इलेस्टा कंपनीचा अन्नड्रॉइड टी.व्ही.,११ हजार ५०० रुपये किमतीचा ३२ इंची इलेस्टा एल.ई.डी. स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,१७ हजार ५०० किमतीचा ४० इंची इलेस्टा एल.ई.डी. स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,२९ हजार ५०० किमतीचा ५० इंची इलेस्टा एल.ई.डी.स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,१२ हजार ५०० किमतीचा ४० इंची आयवा कंम्पणीचा एक एल.ई.डी.स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,०९ हजार ८०० किमतीचा ३२ इंची आयवा कंम्पणीचा एक एल.ई.डी.स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,१५ हजार ५०० किमतीचा ४३ इंची आयवा कंपनीचा एक एल.ई.डी.स्मार्ट एन्ड्रॉइड टी.व्ही.,२० हजार ४०० किमतीचे १२ व्ही.गार्ड कंम्पणीचा एक नवीन स्टेबीलायझर,०८ हजार ५०० किमतीचे रसोयी कंम्पणीचा ०५ नवीन मिक्सर असे एकूण ०४ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.त्यांनी या प्रकरणी शिर्डी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३१३/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस गुलाबराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करीत आहेत.