निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या विकास सेवा संस्थेवर युतीची सत्ता कायम

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या सोनेवाडी विकास सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून १३ जागा असलेल्या संचालक मंडळात आधीच पाच संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.मात्र एक उमेदवारी अर्ज रिंगणात राहिल्याने आठ विरुद्ध एक अशी जनरल जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.त्यात वीरभद्र माऊली जनसेवा पॅनलचे (परजणे-कोल्हे गटाचे) सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.नूतन संचालकांचे सर्वातर अभिनंदन होत आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या या निवडणुकीमध्ये अप्पासाहेब मोहन जावळे यांचा पराभव करत कोल्हे-परजणे युतीचे उमेदवार बाबासाहेब राधाजी फटांगरे,दिलीप तुकाराम गुडघे,निरंजन दौलत गुडघे,भाऊसाहेब नाथू गुडघे, राजेंद्र विश्वनाथ गुडघे,संदीप ज्ञानदेव गुडघे,संदीप धनाजी जायपत्रे,दीपक परसराम जावळे हे विजयी झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संस्थेचे माजी अध्यक्ष कै.ज्ञानदेव गुडघे व माजी अध्यक्ष कै.सकाहरी राऊत यांचा मागच्याच वर्षी कोरोनाने मृत्यू झाला होता.परजणे व कोल्हे गटाचे नेतृत्व गेल्या ३५ वर्षांपासून हे दोघे करत होते. निवडणूक बिनविरोध करून कै.गुडघे व कै.राऊत यांना आदरांजली देण्याचा निर्णय सभासद व संचालक मंडळाने घेतला होता.तेरापैकी पाच जागेवर वंदना दगू गुडघे व मंडाबाई चापाजी जायपत्रे या महिला राखीव मतदार संघातून,रघुनाथ कुंडलिक मिंड इतर मागास प्रवर्गातून,राहूल व्यंकट राऊत भटक्या-विमुक्त वर्गातून तर मारुती चंदर माळी हे अनुसूचित जाती जमातीतून बिनविरोध निवडून आले होते.सर्वसाधारण जागेसाठी आठ उमेदवार बिनविरोध निवडून देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.परंतु आप्पासाहेब मोहन जावळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सर्वसाधारण मतदार संघातून मागे घेतला नाही.त्यामुळे आठ विरुद्ध एक अशी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीमध्ये अप्पासाहेब मोहन जावळे यांचा पराभव करत कोल्हे-परजणे युतीचे उमेदवार बाबासाहेब राधाजी फटांगरे,दिलीप तुकाराम गुडघे,निरंजन दौलत गुडघे,भाऊसाहेब नाथू गुडघे, राजेंद्र विश्वनाथ गुडघे,संदीप ज्ञानदेव गुडघे,संदीप धनाजी जायपत्रे,दीपक परसराम जावळे हे विजयी झाले.निवड प्रक्रियेचे कामकाज सहाय्यक निबंधक श्री ठोंबळ,तालुका सुपरवायझर श्री पानगव्हाणे,श्री रहाणे,अशोक केंदळे,संजय गोसावी,रामभाऊ पाडेकर,रवींद्र दातार,रवी पवार, संस्थेचे सचिव अशोक गायकवाड,सुकदेव चौधरी,सुनील मिंड,सुनील गुडघे आदींनी पाहिले आहे.नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.