कोपरगाव तालुका
कोपरगावात…या हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबीर संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या श्री जनार्दन हॉस्पिटल मध्ये सोमवार ०२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वेळेत हे शिबीर ठेवण्यात आले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सदर शिबिराची सुरवात श्रीफळ व रेबिन कापून करण्यात आली.उद्घाटनावेळी राष्ट्संत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,एच.आर सचिन जानवेकर,डॉ.प्रसाद उंबरकर,मार्केटिंगचे महेश रक्ताटे,उत्तम भागवत,डॉ.सायली ठोंबरे,होते या शिबिरात तज्ञ डाॕक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ स्नेहल भाकरे,ह्र्दयशस्त्रक्रिया तज्ञ डॉ.नीरज काळे,न्युरोसर्जन डॉ.प्रसाद उंबरकर,नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रशांत सगळगीळे,एम.डी.मेडिसीन तज्ञ डॉ.सायली ठोंबरे,बालरोगतज्ज्ञ तज्ञ डॉ.अनंतकुमार भांगे,इत्यादी डाॕक्टर उपस्थित होते या शिबिरात एकूण ४५० रुग्णांनी नोंदणी करून शिबिराचा फायदा घेतला आहे.
यात मणक्याचे आजार,हाडाचे आजार,किडनीस्टोन,डोळ्याचे आजार,लहान मुलांचे आजार,अॅन्जिओग्राफी,अॅन्जिओप्लास्टी,एक्सरेची मोफत तपासणी झाली.शिबिरात बी.पी.,ई.सी.जी.शर्करा,या तपासण्या मोफत केल्या.सवलतीच्या माफक दरात एम.आर.आय व सिटी स्कॅन करुन देण्यात आले.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.या शिबिरातुन रुग्णाचा आजार निष्पन्न होऊन ३५ रुग्ण उपचरासाठी भरती करण्यात आले आहे.