कोपरगाव तालुका
कोपरगाव पंचायत समितीचे कार्य लक्षवेधी ठरले-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी रस्ते,पाणी,आरोग्य,शिक्षण आदी विभागात मोठे योगदान दिले असून मागील पाच वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
“कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने टाकलेल्या विश्वासाची परतफेड सर्व सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामे करून केली. मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत नेवून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,श्री साई संस्थान शिर्डी.
नगर जिल्हा परिषद व कोपरगाव पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे मावळत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा कोपरगाव येथे आ. काळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,सुधाकर दंडवते,विमल आगवन,सोनाली रोहमारे,सोनाली साबळे,पंचायत समितीच्या माजी सभापती अनुसया होन,पौर्णिमा जगधने,अनिल कदम,माजी सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,बाळासाहेब रहाणे,दिलीप दाणे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,रोहिदास होन,प्रसाद साबळे,राहुल जगधने,अभियंता उत्तम पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप,डॉ.काटे मॅडम,गटशिक्षण अधिकारी शबाना शेख,कृषी अधिकारी पंडित वाघिरे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने टाकलेल्या विश्वासाची परतफेड सर्व सदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामे करून केली. मिळालेल्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत नेवून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असल्याचे गौरवदगार त्यांनी शेवटी काढले आहे. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक कारभारी आगवन यांनी केले तर सूत्रसंचलन अर्जुन काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी मानले आहे.