आंदोलन
किरीट व निल सौमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा-कोपरगावात सेनेची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय युध्दनौका ‘आय.एन.एस.विक्रांत’ ला वाचविण्याच्या नावाखाली लोकवर्गणीतून प्रचंड निधी गोळा केला व तो निधी महाराष्ट्राचे राजभवन (राज्यपाल भवन) येथे जमा न करता तो स्वतःच्या व्यवसायासाठी वापरून माजी खा.किरीट सोमय्या यांनी निधी हडप करुन घोटाळा केला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख वासुदेव देसले यांचे कडे केली आहे.
“भारतीय युध्दनौका ‘आय.एन.एस.विक्रांत’ ला वाचविण्याच्या नावाखाली लोकवर्गणीतून प्रचंड निधी गोळा केला व तो निधी महाराष्ट्राचे राजभवन (राज्यपाल भवन) येथे जमा न करता तो स्वतःच्या व्यवसायासाठी वापरून माजी खा.किरीट सोमय्या यांनी निधी हडप करुन घोटाळा केला आहे.त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी”-राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख,उत्तर नगर जिल्हा शिवसेना.
“आय.एन.एस.विक्रांत” हि युद्ध नौका कधीकाळी भारताच्या पाकिस्तान विरोधातल्या युद्धाची साक्षीदार बनलेली युद्धनौका.तिचं म्युझियम होणं तर राहिलंच पण सध्या वेगळ्याच कारणामुळे ‘ती’शिवसेना खा.संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वादात कळीचा मुद्दा बनली आहे.त्यावरुन ठिकठिकाणी आंदोलनाचीही ठिणगी उडत आहे.वर्तमानात शिवसेना आणि भाजप या मुद्द्यावरुन आता थेट एकमेकांशी भांडत आहेत.कोपरगावातही याच कारणावरून आंदोलनाची ठिणगी उडाली आहे व भाजपचे माजी खा.किरीट सोमैय्या यांच्यावर शिवसेना तुटून पडली आहे.शिवसेनेचे उत्तरजिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देऊन माजी खा.सोमैय्या यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
त्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की,”भारतीय युध्दनौका ‘आय.एन.एस.विक्रांत’ ला वाचविण्याच्या नावाखाली लोकवर्गणीतून प्रचंड निधी गोळा केला व तो निधी महाराष्ट्राचे राजभवन (राज्यपाल भवन) येथे जमा न करता तो स्वतःच्या व्यवसायासाठी वापरून माजी खा.किरीट सोमय्या यांनी निधी हडप करुन घोटाळा केला आहे.त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी प्रमुख मागणी कोपरगाव येथे उत्तर नगर जिल्हा शिवसेने च्या वतीने करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,वाहतुक सेनेचे जिल्हा अध्यक्ष इरफान शेख,योगेश उशिरे,निलेश पवार,सतिष शिंगाणे,विकास शर्मा,किरण अंढागळे,वैभव गिते,बाळासाहेब सांळुंके,सुनिल कुंढारे,प्रफुल्ल शिंगाडे,पप्पु पेकळे,राहुल देशपांडे, निखिल मढवई सागर सोमवंशी,राहुल हंसवाल,शैलश वाघ,मयूर दळवी,वैभव गिते,उमेश छुगाणी,गणेश पवार,निलेश पवार,राहुल हंसवाल आदि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.