कोपरगाव तालुका
आनंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांची लक्षवेधी कामगिरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मिरज येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या संगीत विषयांच्या परिक्षेत कोपरगाव येथील आनंद संगीत विद्यालयातील कोमल राजेंद्र हिंगमिरे, अंकिता सुनिल मंडलिक, शिवानी अनिल धुमाळ या विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणीत उच्चांक व विशेष योग्यता मिळवून संगीत विशारद ही पदवी मिळवली असून विशारद पूर्ण परिक्षेत देण्याची विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती विद्यालयाचे संचालक आनंदराव आढाव यांनी दिली आहे.
शहरातील पन्नास वर्षांपासून संगीत विषयात शिक्षण देणाऱ्या आनंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन, प्रथम गायन,वादन परीक्षेत परीक्षेत अजय अरूण आहेर, रोहीत आण्णासाहेब खटकाळे, या विद्यार्थीनींनी गायन, हार्मोनिअम वादन या विषयात लक्षवेधी यश संपादन केले तर प्रवेशिका पूर्ण परिक्षेत उत्कर्षा आण्णासाहेब थोरात, अध्दा अरूण सोमासे यांनी यश संपादन केले.मध्यमा प्रथम गायन हार्मोनियम विषयात वेदांती लुपाटकी तर मध्यमा पूर्ण परिक्षेत गायन विषयात संजय चोकणपळे, वैष्णवी सतिश कुलकर्णी तर विशारद पूर्ण परिक्षेत कोमल राजेंद्र हिंगमिरे, अंकिता सुनिल मंडलिक, शिवानी अनिल धुमाळ या विद्यार्थीनींनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
या विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे संचालक आनंद आढाव व संगीत शिक्षिका रेखा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे,विकास किर्लोस्कर , अॅड.बी.वाय. काळवाघे, अॅड,सी.एम.वाबळे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.