कोपरगाव तालुका
नगर जिल्ह्यात २३८ पानंद रस्त्यांना मंजुरी,तर कोपरगावात १४ रस्त्यांना हिरवा कंदिल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील शेत-पाणंद रस्त्यांचा आराखडा तयार करून या रस्त्यांचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत २०२२-२३ च्या वार्षिक आराखड्यामध्ये समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा सुरु होता.त्या पाठ्पुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने नुकतीच मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत २०२२-२३ च्या वार्षिक आराखड्यास मंजुरी दिली आहे.त्यात संगमनेर तालुक्याने सर्वाधिक १३७ पानंद रस्ते तर त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यांत ३४ तर त्या नंतर शेवगाव तालुक्यात १९,नेवासा तालुक्यात १७,पाथर्डी तालुक्यात १६ तर सर्वात कमी कोपरगाव तालुक्यात १४ असे ऐकून नगर जिल्ह्यात २३८ रस्त्यांच्या आराखड्यास आगामी उन्हाळ्यात विनाखंड काम करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे तालुक्यात हि योजना राबविल्याबद्दल ना.काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अनेक गावातील शेत-पाणंद रस्त्यांचा एकत्रित आराखडा तयार करून या रस्त्यांचा वार्षिक आराखड्यात समावेश होवून या रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी संगमनेर,पाथर्डी,पारनेर,नेवासा आदी तालुक्यातून मागणी होती.त्या पाठपुराव्यातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील १६ किलोमीटर रस्त्यांचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंत २०२२-२३ च्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात देण्यात आली आहे.यात केंद्र सरकारकडुन अतिरिक्त निधी मिळणे अभिप्रेत आहे.
या आराखड्यामध्ये मतदार संघातील १४ गावातील १६ किलोमीटर रस्त्यांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या २०२२-२३ च्या वार्षिक आराखड्यात समाविष्ट करण्याच्या आराखड्यास मान्यता दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील शेत-पाणंद रस्त्यांचा एकत्रित आराखडा तयार करून या रस्त्यांचा वार्षिक आराखड्यात समावेश होवून या रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी ना.काळे यांचे जिल्ह्यातून मागणी होती.त्या पाठपुराव्यातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील १६ किलोमीटर रस्त्यांचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंत २०२२-२३ च्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात देण्यात आली आहे.यात केंद्र सरकारकडुन अतिरिक्त निधी मिळणे अभिप्रेत आहे.
यामध्ये डाऊच बु.ते देर्डे चांदवड रोड ०२ किमी,मोर्वीस येथील सोपान जासुदार पगारे यांचे शेत ते गुलाब निवृत्ती सरडे यांचे शेत ०२ किमी,मल्हारवाडी ते मनेगाव रस्ता ०१ किमी, घारी ते हिंगणवेढे वस्ती जोड रस्ता ०१ किमी,वारी येथील चोंडीनाला ते ठोंबरे वस्ती ०१ किमी,धोत्रे ते लाख रस्ता ०१ किमी, मंजूर येथील राज्य महामार्ग ०७ ते शिवरस्ता ०१ किमी,उक्कडगाव आपेगाव रस्ता उक्कडगाव रोड ०१ किमी,कोळगाव थडी येथील खंडोबा वस्ती रोड बाळासाहेब चव्हाण शेत ते अशोक चव्हाण यांचे शेत ०१ किमी,तिळवणी उक्कडगाव रस्ता तिळवणी रोड ०१ किमी,मढी खु. येथील जि.प.शाळा वस्ती ते आण्णा सूर्यभान आभाळे घर ०१ किमी,धारणगाव ते सोनारी शिवरस्ता ०१ किमी,अंचलगाव ते बोलकी शिवरस्ता ०१ किमी,जेऊर पाटोदा गावठाण कोपरगाव रस्ता ०१ किमी या रस्त्यांचा समावेश आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंत २०२२-२३ च्या आराखड्यामध्ये १६ किमी शेत-पाणंद रस्त्यांच्या आराखड्यात समाविष्ट केल्याबदल वरील सर्व गावातील नागरिकांनी ना.काळे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.