कोपरगाव तालुका
…या गावातून अल्पवयीन मुलीस पळविले, गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कायमच चर्चेत असलेल्या सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळविले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सुरेगाव सध्या मुलींचे अपहरण,बलात्कार,आदी बाबत गाजत असताना या बाबत पोलिसांवर जबाबदारी वाढली असून दरम्यान याच गावातून एक तरुणही गायब असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदर चे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे सतरा कि.मी.अंतरावर सुरेगाव ग्रामपंचायत असून या गावात मोठी लोकसंख्या असून श्रमिक वर्गही मोठ्या संख्येने आहे.या गावात काही दिवसात बलात्कार,अपहरण,विनयभंग या गुन्ह्याबाबत मोठी चिंताजनक वाढ झाल्याचे आढळून येत आहे.सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबात फिर्यादी महिला तिचा पती एक मुलगी असे एकत्र राहतात.मात्र त्यांची सतरा वर्षीय मुलगी बुधवार दि ४ मार्च रोजी रात्री १० ते रात्री गुरुवार दि ५ मार्च रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेली असल्याची बाब फिर्यादी महिलेच्या लक्षात आली त्यांनी आज दुपारी १.२८ वाजेच्या सुमारास या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.न.६९/२०२० भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन भताने हे करीत आहेत.दरम्यान याच गावातून एक तरुणही गायब असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.