धार्मिक
मनुष्य जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा अपरिहार्य-आवाहन
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ह.भ.प.वाल्मीक महाराज जाधव यांनी १०१ दिवसात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज यांचे हस्ते जाधव यांचा समाधी मंदिरात सत्कार करण्यात आला आहे.
“नर्मदा परिक्रमा हि अत्यन्त महत्वपूर्ण असून ती पूर्ण होण्यासाठी पूर्व जन्माचे पुण्याचे गाठोडे असावे लागते,ज्यावेळेस माणूस परिक्रमा करण्यास तयार होतो.तेंव्हापासून भक्ताच्या योग क्षेमाची काळजी ही भगवंतच पाहत असतो”-ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव.
परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक,नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते.परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही.म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते.सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे,किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे,वाटेत मिळेल ते पाणी पिणे,जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते.
रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा,स्नान,संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमा दरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.हि परिक्रमा अत्यन्त खडतर मानली जाते ती करून वाल्मिक महाराज यांनी प्रेरणादायी उदाहरण स्थापित केले आहे.त्याबद्दल त्यांचे संवत्सर येथे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.त्या प्रसंगी रमेशगिरी महाराज बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,कोपरगाव शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,सदस्य महेश परजणे,भरत बोरनारे,मुकुंद काळे,लक्ष्मण साबळे,सुदाम साबळे,पत्रकार शिवाजी गायकवाड,प्रेस फोटोग्राफर दत्तात्रय गायकवाड,भरत साबळे,मोहन सोनवणे,प्रकाश गायकवाड,शंकर दैने,दिनेश लोखंडे,लक्ष्मण परजणे,सुभाष बिडवे,ज्ञानेश्वर टूपके,प्रताप वरगुडे,बाळू भोसले,जगताप सर,विविध भजनी मंडळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
वाल्मिक महाराजांचे पूजन कुटुंबाचे संदीप जाधव यांनी केले.नंतर संवत्सर गावात आगमन झाल्यानंतर गावातून टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.सदर प्रसंगी ५१ महिलांनी डोक्यावर कलश घेऊन फुगड्या खेळत मिरवणुकीत सहभागी होत महाराजांचे औक्षण करून स्वागत केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मण साबळे यांनी केले तर संदीप जाधव यांनी आभार मानले.