खेळजगत
राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत महर्षी स्कुलच्या खेळाडुनां सुवर्ण पदक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकत्याच शिर्डी येथे १६ व्या राष्ट्रीय सबज्युनिअर जम्परोप स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत संपुर्ण भारतातुन २२ राज्यातील ३५० खेळाडुनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महर्षी स्कुलच्या दोन खेळाडुंनी सहभाग नोंदवला असून साई महेश गोसावी याने ३० सेकंद वेग या प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले तर ओम उमेश गोसावी याने ३ मीनिट इंडोअरन्स या प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धांमध्ये फीट इंडिया या योजने अंतर्गत पंचायत समीती कोपरगाव व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने मुलींच्या १०० मी. धावणे तालुका स्तरीय स्पर्धा एस.एस.जी.एम. महाविद्यालय येथे संपन्न झाल्या यामध्ये बालगटात ऋतुजा किरण वक्ते हिने द्वीतीय क्रमांक मिळवला व रजत पदक पटकाविले तीची निवड जिल्हास्तरीय गो-गर्ल-गो २०२० साठी झाली आहे. या गुणवंत खेळाडुंचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका जे.के.दरेकर, व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले या यशस्वी खेळाडुला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके, गणेश वाकचौरे व प्रिया बोधक यांचे मार्गदर्शन लाभले होते.