निधन वार्ता
कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश…यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मकरंद सुधीर बोधनकर (वय-५५) यांचे नुकतेच त्यांच्या गावाकडे नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,दोन मुली,आई असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.न्या.बोधनकर यांनी सात वर्षांपूर्वी देशभर गाजलेल्या माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांच्या सभेपूर्वी दि.१० ऑगष्ट २०१४ रोजी शांत बसलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांवर राहाता पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठी हल्ला करून त्यांनाच आरोपी ठरवलेल्या शेतकरी व निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्ते पत्रकार नानासाहेब जवरे,गंगाधर गमे,दौलत दिघे,विठ्ठल घोरपडे व अन्य एक अशा पाच सहकाऱ्यांना निर्दोष घोषित केले होते.
स्व.न्या.मकरंद बोधनकर यांनी प्रथम वाशीम येथे आपल्या सेवेची सुरुवात केली होती.त्या नंतर त्यांनी मुंबई,नाशिक आदी ठिकाणी सेवा बजावून ते नाशिक येथून त्यांची बदली कोपरगाव येथील जिल्हा व स्तर न्यायालय येथे जून २०२१ रोजी झाली होती.त्यांनी आपल्या कोपरगाव येथील न्यायालयात अनेक दावे निकाली काढले होते.या शिवाय लोकन्यायालयात अनेक दावे निकाली काढले होते.ते अत्यंत धीरगंभीर,मितभाषी व विधी क्षेत्रातील अभ्यासू म्हणूल ओळखले जात.नुकतेच आपल्या मातोश्रींना आणण्यासाठी गावाकडे गेले होते.तिकडेच निर्दयी काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.त्यांच्या गावी नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा न्यायालयाचे वकील अशोक वहाडणे यांनी दिली आहे.
त्यांनी सात वर्षांपूर्वी देशभर गाजलेल्या माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांच्या सभेपूर्वी दि.१० ऑगष्ट २०१४ रोजी शांत बसलेल्या निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांवर राहाता पोलिसांनी केलेल्या निर्दयी लाठी हल्ला करून त्यांनाच आरोपी ठरवलेल्या शेतकरी व निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्ते पत्रकार नानासाहेब जवरे,गंगाधर गमे,दौलत दिघे,विठ्ठल घोरपडे व अन्य एक अशा पाच सहकाऱ्यांना निर्दोष घोषित केले होते.
त्यांच्या निधनाबद्दल श्री साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी,अड्.अशोक वहाडणे,अड्.शंतनू धोर्डे,अड्.मच्छीन्द्र खिलारी,अड्.शिरिषकुमार लोहकणे,अड्.अशोक टुपके,विद्यमान अध्यक्ष विद्यासागर शिंदे,अड्.दिलीप लासुरे,अड्.नरेंद्र संचेती,अड्.ए. जी.दारुवाला.अड्.एस.एस.शेख,अड्.योगेश खालकर,निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.