जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

कोपरगाव तालुक्यात विज बिलांसाठी महावितरणचे आर्जव !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यासह कोपरगाव तालुक्यात महावितरण कंपणीचे विज बिल मोठ्या प्रमाणात थकीत झाले असून या साठी ते शेतकऱ्यांचे वारंवार आर्जव करत असताना दिसत आहे.त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आल्याचे दिसत आहे.तर दुसरीकडे शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना वीज बिल देणे लागत नसल्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.त्याबाबत महावीतरण कंपनी व शेतकरी संघटना यांनी संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

राजकीय पक्षांच्या निवडणूक पुर्व कृषीपंपाच्या विजबिलांबद्दलच्या मेघगर्जना आणि सत्तेत आल्यानंतर राज्यशासनाने घेतलेले कडक धोरण,आणि महावितरण प्रशासनाकडून होणारी कृषीपंप बिलांची अनियमितता यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची आणि महावितरण कर्मचाऱ्यांची वसुली वरुन तु-तु-मै-मै होत असते.सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडी सुरु असल्यामुळे महावितरणने रोहित्र बंद करण्याचा घाट घालुन शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे.अशा वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विजबिलांची प्रेमाने कशा प्रकारे वसुली करता येईल या उद्देशाने तालुक्यातील पढेगाव येथे महावितरण सवंत्सरचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे,तारतंत्रीअष्टेकर, महेश चव्हाण यांनी नुकतीच शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेतली आहे.

यावेळी बोरसेंनी शासनाची थकीत विजबिलासाठी सवलतीची योजना विषद करुन पुर्ण थकबाकी भरावी नाहीतर आठ दिवसांच्या मुदतीत किमान प्रती कृषीपंप पाच हजार रुपये भरावे अन्यथा रोहित्रांचा विजपुरवठा बंद करणार असल्याचे सुतोवाच केले.अगोदरच कोरोनात होरपाळून निघालेला व खरीपात अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना यातुन मार्ग काढणे तसे कठीण झाले आहे. कर्मचाऱ्यांना दोष न देता शेतकरी वर्ग सरकारवर रोष व्यक्त करत आहे.

सदर प्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने उत्तम चरमळ यांनी प्रास्तविक केले.तर सरपंच प्रकाश शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानत शेतकऱ्यांप्रती सहानुभूतीने विचार करण्याची विनंती केली आहे.पढेगावसह परिसरातील बहुतांशी शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close