जाहिरात-9423439946
सहकार

कर्मवीर साखर कारखाण्याचा गळीत हंगाम सांगता संपन्न,…इतका दर मिळाला वाढीव

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या ६७ व्या गळीत हंगामात ०७ लाख ९७ हजार टन उसाचे गाळप केले असून त्या पासून ८ लाख ७७ हजार ५०० क्विंटल साखर निर्माण केली असून शेतकऱ्यांना आणखी प्रति टन १०० रुपये देणार असल्याचे प्रतिपादन या कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच संपलेल्या गळीत हंगाम २०२१-२२ च्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभाच्या वेळेस केले आहे.

“नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात अधिकच्या ऊस गळीतांचे मोठे आव्हान होते.०७ लाख ९७ हजार टन उसाचे विक्रमी गाळप केले असल्याचे सांगितले आहे.२०३ कोटी रुपये ऊस उत्पादकांचे दिले आहे.व आगामी पाच महिन्यात गाळप सुरू करावे लागणार आहे”-सुनील कोल्हे,कार्यकारी संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा ६७ व्या गळीत हंगाम २०२१-२२ चा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर व त्यांच्या धर्मपत्नी राजनंदाताई आहेर यांच्या हस्ते माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे,कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,कारखान्याचे संचालक नारायण मांजरे,ज्ञानदेव मांजरे,कारभारी आगवन,राजेंद्र घुमरे,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,संजय आगवन,अनिल शिंदे,स्नेहलताई शिंदे,छाया आहेर,गोदावरी केन ट्रान्स्पोर्टचे कंपनीचे संचालक,श्री पवार,कार्यकारी संचालक भिकाजी सोनवणे,दिलीपराव शिंदे,सल्लागार चव्हाण,सचिन चांदगुडे,बाजार समितीचे संचालक मधुकर टेके,देवराम दवंगे,कचरू घुमरे,कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,बी.बी.सय्यद,आसवनी प्रकल्पाचे संचालक डी.बी.आभाळे,डी.जी.चव्हाण,रसायन तज्ञ ताकवणे, मुख्य अभियंता एन.बी.गांगुर्डे,वित्त व्यवस्थापक एस.एस.बोरणारे,शेतकी अधिकारी ए.व्ही.कापसे,सचिव डी व्ही.आभाळे बाबा सय्यद,आदी मान्यवर उपस्थित होते.

गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल आ.काळे यांनी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांचा सत्कार केला आहे.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,१६२ कारखान्याचा हंगाम संपला आहे.१ हजार ३०० मेट्रिक टन गाळप झाले आहे.विक्रमी साखर उत्पादन झाले आहे.दोन वर्षात चांगले पर्जन्यमान झाल्याचा हा परिणाम आहे.अद्याप एक लाळ टन ऊस शिल्लक आहे आजून पंधरा दिवस कारखाने चाल णार आहे.११ हजार हेक्टर ऊस नोंदवला गेला होता.५०० हे.ऊस बेणे व चारा निर्मितीसाठी जाणार आहे.यात ०७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे.कार्यक्षेत्राचे बाहेर ऊस उत्पादक विनंती करत होते मात्र कार्यक्षेत्रात ऊस जास्त असल्याने कठोर निर्णय घ्यावा लागला होता.

दर वर्षी शेतकरी नोंद करत नाही त्यामुळे समस्या निर्माण होते.अशी ८०० हेक्टर नोंद आढळली त्यामुळे पेच निर्माण झाला होता.ऐन वेळी पंचायत होते.रोज चार ते पाच हजार टन मजूर ऊस तोडून देत होते.मात्र फेब्रुवारी-मार्च मध्ये तापमान वाढले त्यामुळे मजुरांची कार्यक्षमता घटते.त्यात यात्रा जत्रा मुळे व्यत्यय येतो.ऊसतोड मजूर निघून जातात त्यामुळे शेतकी यंत्रणेवर ताण आला होता.सुरुवातीला दोन तीन तोडणी यंत्र होते मागवून ते पाच ते सहा झाल्याने दिलासा मिळाला होता.त्यामुळे विक्रमी पंधरा हजारावर हेक्टरी वाढ झाली होती.शेतकी विभागाने आत्तापासूनच वाढीव तोडणी यंत्र मिळण्यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांनी आता त्यासाठी पाच फुटी ऊस लागवड करावी तरच आगामी गाळप सुकर होऊ शकते.

जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण होईल असा अंदाज होता मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे त्याची संधी मिळाली आहे.देशांतर्गत ८५ लाख मेट्रिक टन साठा आवश्यक होतं.९० लाख टन निर्यात होणार आहे.गत वर्षी निर्यात अनुदान मिळाले होते.त्याचा फायदा झाला यावर्षी अनुदानाची गरज पडली नाही.देशातील साखर कारखानदारांनी मोठे परकीय चलन मिळून दिले आहे.एक जून पासून निर्यातीवर बंधने येऊ शकतात असा कयास व्यक्त करून ७० लाख टन साखर उपलब्ध ठेवावी लागणार आहे.कच्ची साखर बनवायची सोया केली २ लाख ७० तणाचे करार केले त्यातील बरीच दिली गेली आहे.पुढच्या हंगामात एक दीड लाख टन साखर साठा ठेवावा लागणार आहे.त्याचा फायदा होणार आहे

शेतकऱ्यांना एक टनास १० साखर उताऱ्याला दर निश्चित करून उर्वरित उताऱ्याला वेगळा दर निश्चित केला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला व शेवटी उतारा गृहीत धरून हंगाम संपल्यावर उतारा धरून दर निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.एफ.आर.पी.पेक्षा दर जास्त म्हणजे २५०० दिला होता.अनेकांनी विरोध केला पण आपण त्याची अंमलबजावणी केली आहे.शेवटी आता हिशेब करून उर्वरित दर जाहीर करून १०० रुपये प्रति मेट्रिक टन दर देणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष कर्मवीर सहकारी साखर कारखाना गौतमनगर.

सुरुवातीस आठशे टन गाळप करणारा कारखान्याने पुरेपूर क्षमतेचा वापर केला आहे.बरीच यंत्रणा जुनी झाली आहे.आता पूर्ण सेट बदलणार आहे.त्याचे काम सुरू झाले आहे.पुढच्या हंगामाच्या आधी ते पूर्ण करणार आहे.नवीन प्रकल्प उभा राहणार आहे.शेतकऱ्यांनी ऊस नोंदवून मदत करावी असे आवाहन करू त्यांनी या हंगामात मदत करणारे शेतकरी,अधिकारी,कर्मचारी,ऊस तोडणी मजूर,तज्ञ आदींचे त्यांनी आभार मानले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे.त्यात नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात अधिकच्या ऊस गळीतांचे मोठे आव्हान होते.०७ लाख ९७ हजार टन उसाचे विक्रमी गाळप केले असल्याचे सांगितले आहे.२०३ कोटी रुपये ऊस उत्पादकांचे दिले आहे.व आगामी पाच महिन्यात गाळप सुरू करावे लागणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे संचालक अरुण चंदरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार माजी संचालक बाळासाहेब बारहाते यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close