कोपरगाव तालुका
खा.पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात राष्ट्रवादीची व्हर्च्युअल रॅली
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.१२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री साईबाबा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.पवार हे वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.आज त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण केले आहे.त्यांना वगळून देशाचा इतिहास लिहिला जाणार नाही.त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी कोपरगावात आ.आशुतोष काळे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे.
इ.स.१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.आज त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण केले आहे.त्यांना वगळून देशाचा इतिहास लिहिला जाणार नाही.त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी कोपरगावात आ.आशुतोष काळे यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे.