जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषद वास्तूचा उपयोग चांगला व्हावा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने शहरात कोटयावधी रुपये खर्चून बांधलेल्या वास्तूंचा नागरिकांनी चांगल्या हेतूसाठी वापर करावा व त्यातून नुकसान होऊ नये असा आशावाद कोपरगाव चे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

दरम्यान या कार्यक्रमात आवाजाची व्यवस्था सुव्यवस्थित नसल्याने उपस्थितांना काहीच ऐकू येत नसल्याने नागरिकांची चुळबुळ सुरू होती.ही व्यवस्था केवळ नावापुरतीच होती.दरम्यान पाच वर्षात संबंधित ठेकेदाराला या कामासाठी किती मुदतवाढी दिल्या याबद्दल ना अध्यक्षांना माहिती देता आली ना मुख्याधिकाऱ्यांना. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.मात्र ठेकेदार प्रशांत महाले यांनी मात्र तीन मुदतवाढी दिल्याचे उशिराने सांगितले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या ०१ कोटी ३२ लाख ४३ हजार ४०३ रुपये खर्चाच्या नूतन डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारतीचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी,गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,प्रतिभा शिलेदार,हर्षाताई कांबळे,माधुरी वाकचौरे,श्रीमती गंगूले,वर्षा शिंगाडे,मेहमूद सय्यद,अजीज शेख,विवेक सोनवणे स्वप्नील निखाडे,आरोग्य सभापती शिवाजीं खांडेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी विजय वहाडणे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव शहरात काम करताना जो अनुभव आला तो विदारक आहे.या वास्तू स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे.या ठिकाणी चलचित्रण व्यवस्था करावी लागेल.त्याच बरोबर ती चोरी होऊ नये म्हणून वेगळा कॅमेरा बसवावा लागेल असा माणसांच्या अपप्रवृत्तीवर बोट ठेऊन टोला लगावला.निखाडे यांनी मांडलेल्या विषयावर बोलताना त्यांनी, चमत्कारिक रित्या आपली भूमिका बदलवताना या विषयाच्या खोलात न जाता व पुरा अभ्यास न करता म्हणाले की,”निळवंडेचा जीवन प्राधिकरणांने सल्ला देण्याचे काम नाही.तलावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.दोन्ही ठिकाणचे पाणी हवे आहे.आगामी १७ डिसेंबर रोजीच्या सभेत आपण विषय घेणार आहोत असा विश्वास दिला.

दरम्यान या कार्यक्रमा संबंधी काहीं नगरसेवकांनी विचारले,”आमचे नाव कोनशीलेवर आहे का ? अशी विचारणा केली,त्यांना उत्तर दिले,” ज्यांनी ज्यांनी आपल्याला पैसे दिले त्यांची नावे टाकली आहेत”असा विनोद साधला आहे.डॉ.आंबेडकरांनी संघर्ष करा व न्याय मिळवा असे म्हटले असले तरी आपण आपल्या आपल्यात संघर्ष करा असे म्हटलेले नाही अशी कोपरखळी मारून काही कार्यकर्ते नेत्यांना खुश ठेवण्यासाठी सामाजिक संकेतस्थळावर फारच सक्रिय असतात असा टोला लगावला व त्यांनी जरूर सक्रिय रहावे पण उगीच नेत्यांच्या पुढे पुढे करून कार्यकर्त्याला मोठे होता येत नाही.नेत्यांना कामाचे कोण व कोण नाही हे माहिती आहे अशी मिश्किल टिपणी केली आहे व त्यांनी जनतेत उगीच गैरसमज पसरू नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान त्यांनी शहरातील मोकाट जनावरांना सोडून नागरिकांना उपद्रव पोहचविणाऱ्या पशु मालकांना फैलावर घेतले आहे.व त्यांनी त्याचा बंदोबस्त करावा असे आवाहन करताना वर्तमानातील कोविड लसीकरण वाढविण्याबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनीं केले तर उपस्थितांसाठी मनोगत व्यक्त करताना माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी त्यांचे नेते वाजवतात ती नेहमीची “निळवंडेची पिपाणी” वाजवली,”त्यात ही जलवाहिणीची योजना साई संस्थान राबवणार आहे,त्याचा खर्च तेच उचलणार आहे.व शहवासीयांना फुकट पाणी मिळणार असल्याचा बिनबुडाचा व हास्यास्पद दावा केला.वाचनालयाचे काम मंजूर करण्यासाठी माजी आ.कोल्हे यांनी प्रयत्न केले होते असा रास्त दावा केला आहे.

यांनी केले तर सूत्रसंचलन अर्चना बोराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार त्यांनीच मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close