कोपरगाव तालुका
कोपरगावातील जिरायती भागास शेती सिंचनाचे पाणी देणार-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सन-२०२४ पर्यंत निळवंडेचे पाणी कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पोहोचविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.त्यामुळे जिरायती भागातील गावांचा पिण्याच्या व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
“निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी असतांना सुद्धा आज पर्यंत ६६६ कोटी निधी दिला आहे.भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून निळवंडे कालव्याच्या अडचणी दूर केल्या आहेत.त्यामुळे २०२४ पर्यत जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पाणी पोहोचणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे गावठाण चौक ते दशक्रिया विधी घाट रस्त्याचे खडीकरण करणे तसेच अंजनापूर येथे गावठाण ते प्रभात डेअरी रस्ता डांबरीकरण करणे,नानासाहेब गव्हाणे घर ते ज्ञानदेव गव्हाणे घर रस्ता डांबरीकरण करणे व अंजनापूर ते बहादरपूर शिवरस्ता खडीकरण करणे आदी विकासकामांचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,राहुल रोहमारे,योगेश खालकर,केशव जावळे,युवराज गांगवे,देवेन रोहमारे,नरहरी रोहमारे,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,कौसर सय्यद,सिकंदर इनामदार,सुधीर पाचोरे,राजेंद्र पाचोरे,उत्तमराव कुऱ्हाडे,राहुल जगधने,नंदकिशोर औताडे,योगेश औताडे,बाळासाहेब औताडे,उपसरपंच गोपीनाथ रहाणे,आप्पासाहेब पाडेकर,कैलास गव्हाणे,बळीराम गव्हाणे,भास्करराव गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,ज्ञानेश्वर गव्हाणे,पोपटराव गव्हाणे,आकाश गव्हाणे,पर्वत गव्हाणे,सरपंच कविता गव्हाणे,संतोष वर्पे,आदी मान्यवरांसह बहादरपूर व अंजनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,”महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी असतांना सुद्धा आज पर्यंत ६६६ कोटी निधी दिला आहे.भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून निळवंडे कालव्याच्या अडचणी दूर केल्या आहेत.त्यामुळे २०२४ पर्यत जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पाणी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्याबरोबरच सर्व खराब रस्त्यांसाठी निधी देवून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.काळे यांनी दिली आहे.
यावेळी भाजपाचे कोल्हे गटाचे विजय कोटकर,रामनाथ गव्हाणे,राहुल गव्हाणे,पुंजाहारी गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.काळे यांनी स्वागत केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक कैलास गव्हाणे तर उपस्थितांना मार्गदर्शन अड्.योगेश खालकर,राहुल रोहमारे,आभार ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी मानले आहे.