कोपरगाव तालुका
कोपरगावात श्रीमद भागवत कथा ज्ञानसोहळ्याचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या भामानगर,साई सिटी,या उपनगरात सागर जाधव स्मृती प्रतिष्ठान व रचना पार्क परिवार यांच्या वतीने ह. भ.प.बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञानसोहळा गुरुवार दि.९ जानेवारी पासून ते गुरुवार १६ जानेवारी पर्यंत आयोजित केला असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कलश मिरवणूक व ग्रंथ दिंडी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे.तरीही या कार्यक्रमाचा नागरिक भावीकभक्त यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.