जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दारूची विनापरवाना वहातूक,तज्ज्ञ संचालकासह दोघांना जेलची हवा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचारी हे आपल्या खाजगी वाहनाने गस्त घालत असताना एक मारुती कंपनीची अल्टो गाडी (क्रं.एम.एच.०१ पी.ए.४७२९) दोन इसम रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास भरधाव वेगाने चालवत असल्याचे त्यांचे लक्षात आल्यावर त्यांनी त्यास थांबविण्याचा इशारा केला असता थांबल्यावर त्या गाडीची तपासणी केली असता त्यात ३०० रुपये किमतीच्या मॅक्डोल नं.१ दारूच्या दीडशे रुपये किमतीच्या १८० मी.ली.च्या दोन बाटल्या आढळून आल्याने शहर पोलिसांनी आरोपी मच्छीन्द्र काशिनाथ लोणारी (वय-६०),व बाळासाहेब ठमाजी संवत्सरकर (वय-४३) दोघे रा.शिंगणापूर ता.कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील ५० हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान आरोपी मच्छीन्द्र लोणारी हा शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा तज्ज्ञ संचालक तर दुसरा आरोपी बाळासाहेब संवत्सरकर हा पंचायत समितीच्या माजी सदस्यांचा पती असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून त्यांना पोलिसांनी अटक केली असून रात्रभर जेलची हवा खाऊ घातली असून आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने त्यांची जामिनावमुक्तता केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे,पो.कॉ.गवारे.श्री काळे,व अंबादास रामनाथ वाघ असे मिळून सायंकाळच्या सव्वा सातच्या सुमारास सुदेश चित्रपट गृहाच्या चौकात आपल्या खाजगी वाहनाने गस्त घालत होते.त्यावेळी वरील नावाचे दोन आरोपी आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची मारुती अल्टो हि कार भरधाव वेगाने व धोकादायक पद्धतीने चालवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तेंव्हा पो.कॉ.अंबादास वाघ यांनी त्यास थांबविण्यास सांगितले असता त्यांनी गाडी थांबविली त्यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे सांगितली तेंव्हा त्यांच्या तोंडाचा आंबट उग्र वास येत होता.त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या गाडीची झडती घेतली असता त्या वरील वर्णनाची दारू दोन बाटल्या आढळून आली. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गु.र.नं. कलम ४२२/२०१९ मुंबई दा.का.कलम ६५(अ ) व मोटार वाहन कायदा कलम १८५,१८४,/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close