जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगावात अवैध कत्तलखाने,हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गोवंश हत्या कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे गोदावरी नदीत हा रक्ताचा महापूर येत असताना व त्याचा नदीकाठच्या देवतावर रक्ताभिषेक होत असतानाही पोलीस व नगरपरिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याच्या निषेधार्थ आज कोपरगाव नगरपरिषदेवर कोपरगाव तालुका गोरक्षा समिती व हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून प्रशासनाचा जोरदार निषेध केला आहे.व कोपरगाव येथील गोवंश हत्या कारणारवर तातडीने गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.

“आंदोलन कर्त्यांनी मागणी योग्य असून ती कायद्याच्या बाहेर नाही.त्या बाबत नगरपरिषद प्रशासनाने अवैध इमारत पाडण्यासाठी कारवाई करावी,आम्ही त्यांना आवश्यक असेल त्या वेळी पोलीस संरक्षण पुरवू” असे आश्वासन दिले आहे.व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे प्रशासनाचे प्रमुख व पदाधिकारी आहेत त्यांनी या कामी पुढाकार घ्यावा”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

१९९५ मध्ये युती सरकारने विधिमंडळात प्राणिरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले.१९९६ मध्ये ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले.पुढे राज्यात सत्ताबदल झाला,केंद्रातही राजकीय परिवर्तन झाले आणि हा कायदा काहीसा विस्मृतीच्या पडद्याआड गेला.परंतु २०१४ मध्ये पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आले आणि केंद्राकडे पडून असलेल्या कायद्याचा पाठपुरावा सुरू झाला.अखेर तब्बल १९ वर्षांनी राष्ट्रपतींनी त्या कायद्यावर मान्यतेची मोहोर उमटवली.गाय,बैल,वळू यांची कत्तल करता येणार नाही,त्या हेतूने त्यांची खरेदी,विक्री करता येणार नाही,विल्हेवाट लावता येणार नाही.गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.बाहेरील राज्यात कत्तल केलेली गाय,बैल,वळू यांचे मांस स्वत:च्या ताब्यात ठेवता येणार नाही.म्हणजेच एक प्रकारे गाय,बैल,वळू यांचे मांस सेवन करण्यासच प्रतिबंध करण्यात आला आहे.यापैकी कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.व अजामीनपात्र गुन्हा समजला जातो.तरीही त्याचे वर्तमानात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सर्रास उल्लंघन सुरू आहे हे विशेष !

दि.०३ ऑक्टोबरच्या रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास धारणगाव रस्त्यावरील नागरे पेट्रोल पंपासमोर मिळालेल्या खबरीनुसार पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सिन्नर तालुक्यातील दहिवाडी येथील आरोपी टेम्पसह ताब्यात घेतला होता. या आधीही सन २०१८ शिवरात्रीच्या दिवशी,१३ जुलै,२०२०,२९ सप्टेंबर २०२०,०२ ऑक्टोबर २०२०,०५ जानेवारी २०२१,या खेरीज अनेक वेळा कोपरगावात गोवंश कायद्याचे दिवसाढवळ्या उल्लंघन होताना दिसत आहे.हे सर्व पोलीस व नगरपरिषद यांच्या नाकाखाली व नाकासमोर टिचून सुरु आहे.विशेष म्हणजे यात काही हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्तेही सामील असल्याच्या धक्कादायक घटना यापूर्वी उघड झाल्या आहेत.या सर्व गोष्टीमुळे कोपरगाव शहरातील जनमानस संतप्त झाले आहे.त्याचा रोष अखेर आज बाहेर पडला आहे.

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गोरक्षा समिती व शिवसेना,भाजप,मनसे आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांनी आधी कोपरगाव तहसील कार्यालय व त्या नंतर कोपरगाव नगरपरिषदेवर आपला मोर्चा वळवला व नगरपरिषद प्रशासन व पोलिस यांचा निषेध व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
सदर प्रसंगी गोरक्षा समितीचे अमित लोहाडे,कैवल्य जोशी,शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी,सुशांत खैरे,सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,भाजपचे माजी शहर चिटणीस योगेश वाणी,बजरंग दलाचे दीपक सिनगर,योगेश भागवत,मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,गणेश शिंदे,मोतीराम निकम,राजेंद्र शुक्ला,आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
तहसील कार्यालयाचे समोर यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी,”पोलीस प्रशासनावर कठोर टीका केली व आगामी ३१ ऑक्टोबर पर्यंत या अवैध कत्तल खाण्याचा बंदोबस्त केला नाही तर आपण थेट सदर ठिकाणी आंदोलन करू असा थेट इशारा दिला आहे.
त्यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,भरत मोरे,कैवल्य जोशी यांनी या अपप्रवृत्तीचा जोरदार निषेध केला असून कोणत्याही स्थितीत हे अवैध कत्तल खाणे बंद करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
तर कोपरगाव नगरपरिषदे समोर कैवल्य जोशी,संतोष गंगवाल,आदींनी आपला राग व्यक्त केला आहे.सदर प्रसंगी सुशांत खैरे यांनी उपस्थित मुख्याधिकारी शांताराम गोसावी,पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांना निवेदन वाचून दाखवले व त्या नंतर ते सर्वांनी सुपूर्त केले आहे.
त्यावेळी मुख्याधिकारी गोसावी यांनी,”आंदोलनकर्त्यांनी कायदेशीर मागण्या केल्या आहेत शिवाय ते चांगल्या कामास सहकार्य करण्यास तयार आहे.त्यामुळे अवैध कामास प्रतिबंध केला जाईल याबाबत ज्यांच्याकडे काही पुरावा असेल तर तो द्यावा” असे आवाहन केले आहे.आंदोलनास उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार सुनील फंड यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close