खेळजगत
कोपरगाव राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत इगतपुरीतील “एकता इलेव्हन”विजयी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका क्रिकेट असोशिएशनच्या वतीने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक माळी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय टी-२० सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धात आज श्री सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयातील प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इगतपुरी येथील एकता इलेव्हनने अहमदनगर येथील साई फाउंडेशनवर ५६ धावांची मात करून “सर सेनापती चषक”पटकावले आहे.त्यांना हा पुरस्कार कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव येथील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इगतपुरी येथील एकता इलेव्हनने अहमदनगर येथील साई फाउंडेशनवर ५६ धावांची मात करून “सर सेनापती चषक”पटकावले आहे.त्यांना हा पुरस्कार कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
कोपरगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नुकत्याच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात पहिले बक्षीस ५१ हजार रुपयांचे जाहीर करण्यात आले होते.अखेरच्या दिवशी अंतिम सामन्यात इगतपुरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली होती.त्यांनी निर्धारित वीस षटकात नऊ गाडी बाद करत १६६ धावांचा डोंगर उभा केला होता.त्यांच्या विरोधात नगर येथील साई फाउंडेशन हा संघ केवळ ११० धावा करू शकला.त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राज्यस्तरीय “सरसेनापती चषक”पुरस्काराचा मानकरी इगतपुरी संघ ठरला आहे.त्या संघाचा खेळाडू अमित गवांदे हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला आहे.तर नगर येथील साई फाउंडेशनचा खेळाडू शुभम नागवडे हा या मालिकेचा मालिका वीर ठरला आहे.
दुसरे ३१ हजारांचे बक्षीस नगर येथील साई फौंडेशनला तर तिसरे एकवीस हजारांचे बक्षीस नगर येथील साई कृपा या संघास,तृतीय अकरा हजारांचे बक्षीस गंगापूर क्रिकेट संघास प्रदान करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर.थोपटे,दीपक नाईकवाडे,सेनेचे संपर्कप्रमुख संकेत माळवे, नगरसेवक अनिल आव्हाड,मेहमूद सय्यद,स्वप्नील निखाडे, अरविंद भन्साळी,उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,दिनार कुदळे,शिवनारायण परदेशी आदी मान्यवरांसह बहुसंख्य क्रिकेटप्रेमी नागरिक तरुण उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धांच्या सामन्याचे पंच म्हणून पवन शिंदे,तुषार विध्वंस यांनी तर सरपंच म्हणून रिजवान पठाण यांनी काम पाहीले. सामन्याचे धावते समालोचन मनोज कपोते,शरद होन,राजेंद्र होन,यांनी केले तर गुणलेखक म्हणून सोहम कोऱ्हाळकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते डॉ.अजय गर्जे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत मनोज कापोते यांनी केले.सुत्रसंचलन मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी मानले.