संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतीच इंग्लिश संभाषण कौशल्य कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली आहे.या कार्याशाळेचे आयोजन विद्यालयाचे मुख्याधापक गोविंद बी.आर. यांचा मार्गदर्शनखाली झाली. या कार्यशाळेसाठी इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षकपंडित भारूड सर यांचे मार्गदर्शन लाभले .इंग्रजी भाषा सहज रितेने कशा पद्धतीने बोलता येते यांची माहिती प्रा.भारूड यांनी विद्यार्थ्यांना दिली.अतिशय सोप्या शैलीत सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलण्याचा संदर्भांत त्यांनी विद्याथीना मार्गदर्शन करून विद्याथीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला .या कार्यशाळेचा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बांधवानी सहकार्य केले.