कोपरगाव तालुका
कोपरगावचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार-आ. काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विकासकामांचा मोठा अनुशेष बाकी असून आपण विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणार असून प्रलंबित विकासकामांना पहिले प्राधान्य देणार असून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार संघातील प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आराखडा तयार करून प्रस्ताव पाठवावे. मतदार संघातील या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची जबाबदारी आपली राहणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी-आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर “राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम” असे केले आहे.पाणी पुरवठा योजनेंतर्गत खालील पाणी पुरवठ्याच्या योजना हाती घेता येतात.
निवडणुकीपुरते राजकारण व त्यानंतर समाजकारण हि आपल्या विकासाची रणनीती राहणार आहे.कोपरगावच्या जनतेने माजी आ. अशोक काळे यांना दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोदावरी नदीवर पूल बांधले व शासकीय इमारती बांधल्या. त्यानंतर ग्रामीण भागाचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याचा पाठपुरावा केला-आ. काळे
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत शहाजापूर ग्रामपंचायतीच्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन होत्या. पुढे बोलतांना ते म्हणाले की, निवडणुकीपुरते राजकारण व त्यानंतर समाजकारण हि आपल्या विकासाची रणनीती राहणार आहे.कोपरगावच्या जनतेने माजी आ. अशोक काळे यांना दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोदावरी नदीवर पूल बांधले व शासकीय इमारती बांधल्या. त्यानंतर ग्रामीण भागाचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याचा पाठपुरावा केला त्याचे हे फलित असून ज्याप्रमाणे शहाजापुरचा पाणी प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणे इतर गावातील नागरिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याबद्दल शहाजापूरच्या शेतकऱ्यांच्या वतीने आ.काळे यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, निवडणुकीपुरते राजकारण व त्यानंतर समाजकारण हि आपल्या विकासाची रणनीती राहणार आहे.कोपरगावच्या जनतेने माजी आ. अशोक काळे यांना दहा वर्ष सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोदावरी नदीवर पूल बांधले व शासकीय इमारती बांधल्या. त्यानंतर ग्रामीण भागाचा जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याचा पाठपुरावा केला त्याचे हे फलित असून ज्याप्रमाणे शहाजापुरचा पाणी प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणे इतर गावातील नागरिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याबद्दल शहाजापूरच्या शेतकऱ्यांच्या वतीने आ.काळे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, पंचायत समितीचे गटनेते अर्जुन काळे, गौतम बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, सिकंदर पटेल, रोहिदास होन, राहुल जगधने, बाबासाहेब वाबळे, भाऊसाहेब वाबळे, भास्करराव वाबळे, विठ्ठल वाबळे, पांडुरंग ढोमसे, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, शिवाजी वर्पे, मच्छिंद्र देशमुख, सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, सर्व सदस्य, उपअभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता ए.पी. वाघ, विस्तार अधिकारी डी. ओ. रानमाळ,ग्रामविकास अधिकारी श्रीमती सुप्रिया टोरपे आदींसह बहू संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र ढोमसे यांनी तर सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.