गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात बोकडांची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले तरुण बापू भगवान कदम (वय-२६) यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बोकड अंदाजे किंमत ०५ हजार रुपये अज्ञात चोरट्यानी रात्रीच्या सुमारास पाळत ठेऊन चोरून नेले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शेळी-मेंढी पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी हे दि.०५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचे जेवणासह नियत कर्म आटोपल्यावर त्यांनी सर्व ठीकठाक असल्याचे पाहून ते व त्यांचे कुटुंब रात्री ०८ वाजता झोपी गेले.व सकाळी उठून त्यांनी आपल्या दैनंदिन कामासाठी शेळ्यांकडे पाहिले असता त्यातील एक ०३ हजारांचा व दुसरा लहान वयाचा ०१ हजारांचा बोकड गायब असल्याचे त्यांचे लक्षात आले.
कोपरगावसह राज्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडून आपला दुग्ध व शेळी-मेंढी पालन हा जोड व्यवसाय करतात.त्यातून त्यांना अल्पस्वल्प उत्पन्न मिळते मात्र रोख चलन मिळत असल्याने त्यांच्या घर प्रपंचास त्याचा मोठा हातभार लागतो.त्यामुळे अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळलेले दिसतात.लौकी गावही त्याला अपवाद नाही.येथील तरुण शेतकरी बापू कदम यांनी आपला शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन स्वीकारले आहे.त्यात त्यांचे कडे एक तीन हजारांचा तर एक एक हजारांचा बोकड आपल्या घरासमोर बांधला होता.
दि.०५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचे जेवणासह नियत कर्म आटोपल्यावर त्यांनी सर्व ठीकठाक असल्याचे पाहून ते व त्यांचे कुटुंब रात्री ०८ वाजता झोपी गेले.व सकाळी उठून त्यांनी आपल्या दैनंदिन कामासाठी शेळ्यांकडे पाहिले असता त्यातील एक ०३ हजारांचा व दुसरा लहान वयाचा ०१ हजारांचा बोकड गायब असल्याचे त्यांचे लक्षात आले.त्यांनी या बाबत नजीक शोधाशोध केली असता ते दोन्ही मिळून आले नाही.अखेर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या संबंधी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव तसेच पो.हे.कॉ.एन.एस.शेख यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं. ३५०/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.