आरोग्य
सोमैय्या महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजिस्ट विद्यार्थी संघाची स्थापना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी विभाग,महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी इंडिया या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजिस्ट विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे.
सोमैय्या महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील कु.शुभांगी निकुंभ व कुमार अखीलेश रूद्रभाटे या दोन विद्यार्थ्यांना विभागामधील लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल एम.एस.आय.यांच्या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी इंडिया ही संस्था भारतात विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रमाचे आयोजन करत असते. या संस्थेच्या कार्याचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने या संघाची स्थापना महाविद्यालयात करण्यात आलेली असून आजच्या उद्घाटन सत्राच्या ऑनलाईन कार्यक्रमात डॉ.संजीव पाटणकर,अध्यक्ष,एम.एस.आय.महाराष्ट्र व गोवा राज्य आणि प्रा.नीलिमा पेंढारकर,समन्वयक,एम.एस.आय. महाराष्ट्र हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातील कु.शुभांगी निकुंभ व कुमार अखीलेश रूद्रभाटे या दोन विद्यार्थ्यांना विभागामधील लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल एम.एस.आय.यांच्या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे एम.एस.आय.चे संस्थापक डॉ.ए.एम.देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.व्ही.सी.ठाणगे,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्रा.आकाश पवार यांनी केले. तर आभार प्रा.पूजा गख्खड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.योगेश चौधरी,कुमार ऋषिकेश जाधव,कु.प्रीती अहीरराव यांनी प्रयत्न केले