आरोग्य
कोपरगाव रुग्णवाढ चिंताजनक,दुकानदारांना तहसीलदारांची तंबी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढीसाठी संगमनेर पाठोपाठ स्पर्धा सुरू झाली असून काल अलीकडील काळातील सर्वाधिक ४१ रुग्ण आढळून आले होते. आज आलेल्या अहवालात पोहेगाव गटातील रांजणगाव देशमुख या ठिकाणी ०३ रुग्ण आढळून आले आहे.तर कोपरगाव शहरात ०५ रुग्ण आढळून आले आहे.तर सुरेगावात-०२,लौकी येथे ०१ रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांवर उपाय योजना करण्यासाठी नूतन तहसीलदार विजय बोरुडे यांनी तातडीची बैठक आयोजित केली होती.त्यात खाजगी आस्थापना व दुकानदारांना आपल्या मर्यादांची जाणीव त्यांनी करून दिली आहे व नियमांचे काटेकोर पालन करण्याची तंबी दिली आहे.व कोरोना कमी नव्हे तर संपविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.व आपण जेथे होतो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण किमान पातळीवर आणल्याचे सांगितले आहे.
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ७५४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०८ रुग्ण बाधित आढळले असून ७४६ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ९३५ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०८ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०२ असे एकूण अहवालात बऱ्या पैकी कमी येऊन केवळ १० रुग्ण बाधित आढळले आहे.तर ३० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख २९ हजार २३१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ५०६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख १६ हजार ९०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ८१५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे. दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास व आठवडे बाजार प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण ग्रामीण भागात बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ४१४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १२० रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१८ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५१ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ८६ हजार ९३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०७ लाख ४७ हजार ७२४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.७१ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार ०७६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.