शैक्षणिक
कोपरगावात सोमय्या महाविद्यालयाचा सी.ए.परिक्षेचा निकाल जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयातील कु.साक्षी संजीव गाडे (द्वितीय वर्ष वाणिज्य) व कु.कविता बाबासाहेब आभाळे (प्रथम वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थिनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेतर्फे जुलै -२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए.फाउंडेशन या परीक्षेत नुकत्याच उत्तीर्ण झाल्या असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“महाविद्यालयातील वाणिज्य विभाग स्थापनेपासून महाविद्यालयाच्या नावलौकिकात सातत्याने भर घालत असून त्यामुळे महाविद्यालयाचे नाव अधिक उज्वल होत आहे.आतापर्यंत विभागातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत”-प्रा.डॉ.एस.आर.पगारे,वाणिज्य विभाग प्रमुख,सोमय्या महाविद्यालय.
सदर विद्यार्थिनींना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ.एस.आर.पगारे,डॉ. एस.एल.अरगडे,प्रा.आर.ए.जाधव,प्रा.अजित धनवटे,प्रा.कु.वर्षा पाचोरे,प्रा.पूजा कापसे,प्रा.गणेश जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले होते.
सदर विद्यार्थिनींनी ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस. यादव,अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रा.विजय ठाणगे व कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.