आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनाची मोठी रुग्णवाढ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जिल्हा परिषद गटात बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून आल्या नंतर आता कोपरगाव प्रशासनाला जाग आली असून त्यांनी बहादरपूर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असले तरी आज आलेल्या अहवालात या गटात ११ रुग्ण आढळून आले आहे.त्यात सर्वाधिक बहादरपुर येथे ०४ तर रांजणगाव देशमुख,मनेगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येकी ०३ रुग्ण असून त्या खालोखाल जवळके येथे ०१ आढळून आला आहे.तर तालुक्यात अन्य ठिकाणी सर्वाधिक मंजूर ०५ रुग्ण तर कोळपेवाडी,धामोरी,प्रत्येकी ०२,नाटेगाव,चासनळी,कोकमठाण,कासली,वारी,प्रत्येकी ०१, तर कोपरगाव शहरात १० रुग्ण आढळून आले आहे.एकूण ३६ रुग्ण तालुक्यात बाधित आढळले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार २०९ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १५५ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ७८ हजार ००६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०७ लाख १२ हजार ०२४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.९८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार ८३७ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.३८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५०४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात २१ रुग्ण बाधित आढळले असून ४८३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५२५ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १२ तर अँटीजन तपासणीत २१ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०३ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण ३६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३४ हजार ०१५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०५ हजार ०३६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख १२ हजार २४८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ७३० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण ग्रामीण भागात बऱ्याच अंशी पुन्हा वाढु लागले आहेत.