कोपरगाव तालुका
दुसऱ्याला जीवदान देण्यासाठी रक्तदानाची गरज-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील समता चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब ऑफ कोपरगाव,लिओ क्लब ऑफ कोपरगाव या कोपरगाव तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या संस्था असून ‘रक्तदान करूया,एखाद्याला नवीन आयुष्य देऊया’ या सामाजिक उपक्रमांतर्गत समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात वार गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर रक्तदान शिबिरासाठी शिर्डी येथील श्री साईनाथ हॉस्पिटल,कोपरगाव लिंगायत संघर्ष समिती आणि राहाता लिंगायत संघर्ष समितीचे यांचे विशेष सहकार्य लाभणार असून समता पतसंस्थेच्या ७७२२०१०२२२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून नावनोंदणी करावी तसेच ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नावनोंदणी करावी.
https://forms.gle/7L2gyYHbZ9ov3ZZZA असे आवाहन लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे यांनी शेवटी केले आहे.