कोपरगाव तालुका
“मातृ वंदना” योजनेच्या रकमेचा योग्य वापर करावा…यांनी केले आवाहन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री मातृ योजनेतून गरोदर मातांना मिळणाऱ्या पैशाचा त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी योग्य वापर करावा व त्या मातांना न्याय द्यावा असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे एका कार्यक्रम प्रसंगी नुकतेच केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सुमारे 5 हजार रुपयांचा सकस आहार पहिल्या खेपेस पुरविण्यात येतो.
गरोदर माता तथा महिलांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे. माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे. तसेच महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.त्या योजनेची महाराष्ट्रासह देशात अंमलबजावणी वर्तमानात सुरु आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.कोपरगाव पंचायत समितीच्या आरोग्य विभागानेही या सप्ताहाचे उदघाटन नुकतेच कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात सभापती अनुसया होन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते रोहिदास होन,सरपंच अमोल औताडे,राहुल रोहमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,पोहेगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बडदे,आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र भांगे,रवींद्र दिवाणे, करूणा नरांजे आदी मान्यवरांसह बहू संख्येने नागरिक उपस्थित होते.
आरोग्यसेविका करूणा नरांजे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्तविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.नितीन बडदे यांनी मानले.त्यावेळी गरोदर मातांना आपले खाते बँकेत उघडण्याचे आवाहनही सभापती अनुसया होन यांनी केले आहे.