शैक्षणिक
कोपरगावात हिंदी दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘हिंदी भाषा दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर अत्तार हे होते.
‘हिंदी भाषा ही ज्ञान भाषा असून राजभाषा देखील आहे.तिने जागतिक स्थरावर व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.त्यामुळे मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे तसेच समतातील विद्यार्थ्यांनी देखील हिंदी भाषेचे ज्ञान अवगत करून जागतिक स्तरावर विचारांची देवाण घेवाण,सुसंवाद करण्यासाठी या भाषेला अनन्यसाधारण महत्व द्यायला हवे”-उपप्राचार्य समीर अत्तार,समता स्कूल.
हिंदी दिवस आणि तो हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याचे कारण खूप जुने आहे.१९१८ मध्ये महात्मा गांधींनी त्याला लोकांची सर्वसामान्यांची भाषा म्हटले आणि त्याला देशाची राष्ट्रीय भाषा बनवण्यास सांगितले.१४ सप्टेंबर १९४९ रोजी स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी संविधान सभेमध्ये हिंदीला राजभाषा घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला परंतु तो एकमताने तो मंजूर झाला नाही. खरं तर १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीचे प्रणेते राजेंद्र सिन्हा यांचा ५० वा वाढदिवस होता,ज्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी दीर्घ संघर्ष केला होता.या दिवशी आपण भारतीयांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण हिंदी भाषा आणि त्याची प्रगती नेहमी पुढे नेली पाहिजे.म्हणून हा दिवस राष्ट्र भाषा दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली आहे.कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये नुकताच ‘हिंदी भाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक स्वाती कोयटे,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन आदी मान्यवरांसह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलतांना समीर अत्तार म्हणाले कि,‘हिंदी भाषा ही ज्ञान भाषा असून राजभाषा देखील आहे.तिने जागतिक स्थरावर व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे.त्यामुळे मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे तसेच समतातील विद्यार्थ्यांनी देखील हिंदी भाषेचे ज्ञान अवगत करून जागतिक स्तरावर विचारांची देवाण घेवाण,सुसंवाद करण्यासाठी या भाषेला अनन्यसाधारण महत्व द्यायला हवे.हिंदी भाषेच्या सन्मानासोबतच इतर सर्व भाषांना देखील समान दर्जा देऊन त्या आत्मसात कराव्यात असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक इ.१० ची विद्यार्थिनी नंदिनी कलंत्री हिने केले.उपस्थितांचे आभार शिक्षक सुनील साळुंखे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी माध्यमिक विभाग प्रमुख शिल्पा वर्मा,हिंदी विभाग प्रमुख अ निता आढाव,शिक्षिका ज्योती घोलप व शिक्षक सुनील साळुंखे,यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.